रत्नागिरी-संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-संक्षिप्त
रत्नागिरी-संक्षिप्त

रत्नागिरी-संक्षिप्त

sakal_logo
By

rat०७११.txt

बातमी क्र. . ११ (टुडे ३ साठी)

फोटो ओळी
-rat७p१८.jpg-
८१०८०
रत्नागिरी ः बसणी येथील महालक्ष्मी मंदिरातील देवीच्या मूर्तीवर पडलेल्या सूर्याच्या किरणांनी मूर्ती उजळून निघाली.
--
बसणीची महालक्ष्मी देवी सूर्यकिरणांनी उजळली

पावस ः तालुक्यातील बसणी येतील स्वयंभू श्री महालक्ष्मी देवी सूर्यनारायणाच्या किरणांनी उजळून निघाली. सूर्याची किरणे सकाळी साडेसात वाजता देवळाच्या दरवाजातून थेट देवीच्या अंगावर पडली. हा रोमांचकारी अनुभव सहा दिवस भाविकांना सकाळी ७ ते ८ च्या दरम्यान पाहायला मिळाला. बसणीचे खोत श्री. राणे आणि प्रशांत बंदरकर यांनी प्रत्यक्ष अनुभवला.
---------
दळवी फाउंडेशनच्या पुरस्कारांचे रविवारी वितरण

रत्नागिरी, ता. ७ ः जिल्ह्यातील शिक्षकांना एस. आर. दळवी (आय) फाउंडेशनच्यावतीने त्यांनी केलेल्या उत्तम कार्याची पोचपावती म्हणून उत्कर्ष शिक्षक पुरस्कार रविवारी (ता. १२) माध्यमिक शाळा सेवक पतपेढीच्या सभागृहात प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कार सोहळ्यामध्ये उत्कृष्ट शाळा पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार, उत्कृष्ट शिक्षक, रायझिंग स्टार हे पुरस्कार शिक्षकांना व शाळेला देण्यात येणार आहेत. या वेळी अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, जिल्हा युवा अधिकारी मोहितकुमार सैनी, अविनाश लाड, एस. आर. दळवी (आय) फाउंडेशनचे संस्थापक रामचंद्र दळवी व गीता दळवी, नयन भेडा आदी उपस्थित राहणार आहेत.