‘स्वाहाकार’ सोहळ्यामुळे कुडाळनगरी भक्तिमय

‘स्वाहाकार’ सोहळ्यामुळे कुडाळनगरी भक्तिमय

81119
कुडाळ ः श्री गवळदेव मंदिरात ॠग्वेद संहिता स्वाहाकार यागाला भाविकांनी गर्दी केली.
81120
ऋग्वेद संहिता स्वाहाकार यागानिमित्त सहाव्या दिवशी श्री गवळदेव महाराज ‘शिवशंकर’ रुपात. (छायाचित्रे ः अजय सावंत)

‘स्वाहाकार’ सोहळ्यामुळे कुडाळनगरी भक्तिमय

आज सांगता; विविध धार्मिक कार्यक्रम; उपस्थितीचे आवाहन

कुडाळ, ता. ७ ः येथील श्री गवळदेव मंदिरात ॠग्वेद संहिता स्वाहाकार याग सोहळ्याने कुडाळ परिसरातील वातावरण भक्तिमय झाले असून भाविकांचीही अलोट गर्दी होत आहे. या सोहळ्याची सांगता उद्या (ता. ८) विविध धार्मिक कार्यक्रमांनी होणार आहे.
येथील श्री गवळदेव मंदिराच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त १ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत ॠग्वेद संहिता स्वाहाकार याग सोहळा २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक असे भरगच्च कार्यक्रम पार पडले. सकाळी स्थापित देवता पूजन, ॠग्वेद शाकल संहिता स्वाहाकार, नैवेद्य, आरती व तीर्थप्रसाद, जागर (राजू मुंडले गुरुजी), आरती, चक्रीभजनाचा महासंग्राम आदी कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. चक्रीभजन कार्यक्रमात बुवा रुपेश परब (वडखोल), चिन्मय सावंत (डामरे कणकवली) व अमित तांबुळकर (तांबुळी) यांच्यातील जुगलबंदी चांगलीच रंगली. त्यांना पखवाज विशारद आनंद मोर्ये (आंदुर्ले), तबल्यावर आबा मेस्त्री (तेंडोली) यांची साथ लाभली. शनिवारी सकाळी स्थापित देवता पूजन, ॠग्वेद शाकल संहिता स्वाहाकार, दुपारी नैवेद्य, आरती व तीर्थप्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम, आरती, सातेरी ग्रुप भजन, वारकरी भजन (वालावलकर यांच्या सौजन्याने) आदी कार्यक्रम भाविकांच्या उपस्थितीत झाले. रविवारी स्थापित देवता पूजन, ॠग्वेद शाकल संहिता स्वाहाकार, नैवेद्य, आरती व तीर्थप्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम, वृंदावनी वेणू कार्यक्रम झाला. यामध्ये बासरी वादक तुषार आसोलकर यांना पखवाज साथ विशाल राणे यांची साथ होती. काल (ता. ६) स्थापित देवता पूजन, ॠग्वेद शाकल संहिता स्वाहाकार, सकाळी धार्मिक कार्यक्रम, बलिदान, दुपारी पूर्णाहूती अभिषेक सांगता, नैवेद्य, आरती, प्रार्थना, आशीर्वाद, समाराधना, नैवेद्य, आरती व तीर्थप्रसाद, श्री गवळदेव कुपन लकी ड्रॉ, सायंकाळी आरती, रात्री नामस्मरण व महिला मंडळाचे भजन, श्री ब्राम्हण देव भजन मंडळाचे भजन, तर आज सकाळी श्री गवळदेव चरणी लघुरुद्र वैगेरे वार्षिक अनुष्ठान, नैवेद्य, आरती प्रसाद, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी हरिपाठ (सद्गुरू वामनराव पै सत्संग), आरती, सिध्दिविनायक भजन मंडळ गांधी चौक (कुडाळ) यांचे भजन, पालखी प्रदक्षिणा, खानोलकर दशावतार नाट्यमंडळाचा ‘दीप माझा वंशाचा’ नाट्यप्रयोग झाला. उद्या (ता. ८) सायंकाळी ४ वाजता दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळाचा ट्रिकसीनयुक्त ‘स्वामी अन्नपूर्णा’ नाट्यप्रयोग आदी कार्यक्रम होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com