कुंडाची दूरवस्था, शौचालयावर 18 लाख खर्च

कुंडाची दूरवस्था, शौचालयावर 18 लाख खर्च

rat७p२५.jpg
८११३५
दाभोळः उन्हवरेतील स्वच्छतागृहाचीही दुरवस्था झाली आहे.
rat७p२६.jpg
८११३६
उन्हवरेतील गरम पाण्याचे कुंड.
----------------
उन्हवरे येथील कुंडाची दूरवस्था
शौचालयावर १८ लाख खर्च; खासदार सुनील तटकरेंनी दखल घेण्याची मागणी

एक नजर...
*नवीन बाधकामांचे झाले वस्त्रहरण
*महिलांच्या स्नानगृहाची अवस्था दयनीय
*पर्यटक महिलांना त्याचा उपयोग शून्य
*कुंडांकडे जाणारे गरम पाण्याचे पाईपही फुटले

दाभोळ, ता. ७ः दापोली तालुक्यातील प्रमुख पर्यटनस्थळ असलेल्या उन्हवरे येथे खासदार सुनील तटकरे यांच्या पुढाकाराने पर्यटनाअंतर्गत मंजूर झालेले उन्हवरे गरम पाणीकुंड परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहाचे काम निकृष्ट दर्जाचे असून मक्तेदारावर नियमानुसार कारवाई करावी, अशी लेखी मागणी ग्रुप ग्रामपंचायत उन्हवरेच्या वतीने केली आहे. कुंडाची दुरवस्था झालेली असल्याने आलेले पर्यटक नाराज होऊन जात आहेत.
रायगड लोकसभा मतदार संघाने खासदार सुनील तटकरे उन्हवरे दौऱ्यावर आले असताना त्यांनी गरम पाण्याच्या कुंडांना भेट दिली व पर्यटनातून येथे विकासनिधी आणण्याचा आपण निश्चितच प्रयत्न करू, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. राष्ट्रवादीच्या तत्कालीन पंचायत समिती सदस्य ममता शिंदे यांनी या विषयाबाबत खासदार सुनील तटकरे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावाही केला होता. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले व पर्यटन राज्यमंत्री म्हणून श्रीवर्धनच्या आमदार आदिती तटकरे यांनी कार्यभार स्वीकारल्यावर त्यांनी उन्हवरे गरम पाण्याच्या कुंडाचे सुशोभीकरण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात सुमारे १८ लाखांचा निधी मंजूर केला. त्यानंतर स्वच्छतागृह बांधण्यात आले; मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा ग्रमस्थांचा आक्षेप असून स्वच्छतागृहाच्या लाद्या, ड्रेनेज पाईप हे नादुरुस्त व निकृष्ट दर्जाचे असून हे काम नक्की १८ लाखाचे आहे की किती रकमेचे हे तपासून पाहण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे ग्रमपंचायतीने बांधकाम विभागाकडे मागितली आहेत. या संपूर्ण प्रकाराची खासदार सुनील तटकरे यांनी गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
या नवीन बांधकामातील महिलांच्या स्नानगृहाची दयनीय अवस्था झाली असून, दरवाजांची मोडतोड झाली आहे. त्यामुळे पर्यटनासाठी येणाऱ्या महिलांना त्याचा उपयोगच होत नाही. कुंडांकडे जाणारे गरम पाण्याचे पाईपही फुटले आहेत. ही कामे प्रमुख्याने होणे गरजेचे असताना संपूर्ण १८ लाखांच्या निधीचे शौचालय बांधल्याने कुंडाची मात्र दुरवस्था झालेली असल्याने आलेले पर्यटक नाराज होऊन जात आहेत. पर्यटनाच्या नावाखाली लाखोंचा निधी वाया जाणार असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com