डेगवेत स्थापेश्वर जत्रोत्सव उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डेगवेत स्थापेश्वर जत्रोत्सव उत्साहात
डेगवेत स्थापेश्वर जत्रोत्सव उत्साहात

डेगवेत स्थापेश्वर जत्रोत्सव उत्साहात

sakal_logo
By

81219
डेगवे ः येथील श्री महालक्ष्मी स्थापेश्वर मंदिरात दर्शनासाठी झालेली भाविकांची गर्दी.

डेगवेत स्थापेश्वर जत्रोत्सव उत्साहात
बांदा ः डेगवे येथील प्रसिद्ध ४८ खेड्यांचे दैवत असलेल्या श्री देव महालक्ष्मी स्थापेश्वर देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव काल (ता. ६) उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा झाला. हजारो भाविकांनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शविली. सोहऴ्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.
सकाळी श्रींची पूजाअर्चा आदी धार्मिक विधी होऊन देवदर्शन, ओटी भरणे, नवस फेडणे-बोलणए आदी कार्यक्रमांना सुरुवात झाली. सायंकाळी भजनसेवेचा कार्यक्रम झाला. रात्री पालखी प्रदक्षिणा सोहळा झाला. त्यानंतर देवेंद्र नाईक संचलित चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ, चेंदवण यांचा ‘पातिव्रत्य तेज’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. जत्रोत्सवानिमित्त मंदिरावर आकर्षक रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती. यावर्षी भाविकांची उपस्थिती उल्लेखनीय होती. वाहतूक तसेच गर्दीचे व्यवस्थापन बांदा पोलिस तसेच पानवऴ कॉलेजच्या एनसीसी व एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे केले. श्री देव महालक्ष्मी, स्थापेश्वर मंदिर ट्रस्ट, डेगवे यांच्यावतीने या सोहळ्याचे उत्तम नियोजन करण्यात आले.