संगीत नाट्य

संगीत नाट्य

rat०८१०. txt

(टुडे पान ४ साठी, अॅंकर)

सं. राज्य नाट्य स्पर्धा--लोगो

फोटो ओळी
-rat८p६.jpg ः
८१२५३
रत्नागिरी ः राज्य नाट्यस्पर्धेत खल्वायन रत्नागिरी या संस्थेने सादर केलेल्या संगीत ऋणानुबंध या नाटकातील एक क्षण. (नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)
------
भरगच्च प्रतिसादात संगीत ऋणानुबंध रंगले

खल्वायनचे सादरीकरण ; दिग्दर्शन, रंगभूषेच्या त्रुटी मात्र अधोरेखित

नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ ः राज्य नाट्यस्पर्धेत येथील खल्वायन रत्नागिरी या संस्थेचे डॉ. श्रीकृष्ण जोशी लिखित नवीन कोऱ्या संहिता संगीत ऋणानुबंध या नाटकाचा प्रथम प्रयोग रंगला. दिग्दर्शक प्रदीप तेंडुलकर यांच्या संकल्पनेतून रंगलेल्या या नाटकाला रसिकांनी भरगच्च प्रेक्षकागृहात टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. नाटकातून सोपी गोष्ट कठीण शब्दशैलीत करून सांगितल्यासारखे रसिकांना वाटले. प्रार्थना, सत्यकाम, सुरमणी, सुत्रधार, जाबाल यांच्या नाट्यपदांना दाद मिळाली. ख्यातनाम गायिका जाबालचा जीवनपट रंगविण्यात संस्था यशस्वी झाली.
-------
काय आहे नाटक?

संगीत ऋणानुबंध या नाटकाची सुरवात नटी आणि सूत्रधार यांच्याकडून होते. दोघेही बोलत असताना संगीत साम्राज्य असलेल्या जाबालच्या प्रदेशात काय चाललंय याचा अंदाज रसिकांना देतात. जाबाल ही प्रख्यात गायिका-गणिकेचा पूत्र सत्यकाम हा गोधन पाळण्यात मग्न असतो. तर तपस्वी आणि प्रार्थना ही दोन मुले जाबालच्या सेवेला असतात. तिचा मुलगा सत्यकाम सत्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडलेला असतो. गुरू आचार्याच्या सांगण्यावरून गोधन पाळत असतो. यामुळे लोकांच्या तक्रारी येतात; मात्र राजवंशी महाराज यावर काही बोलत नाहीत. राज्याला वारस नसल्यामुळे एकेदिवशी राजवंश महाराज जाबालेला ''माझा पुत्र सत्यकाम मला परत करावा'' अशी मागणी करतात; पण ती नकार देते. राजवंश ''मी परत येईन'' असे सांगतात. त्यानंतर जाबालेला साह्य करणारे धनवंत, सुरमणी हे दोघेही तिच्याकडे पुत्राची मागणी करतात. जाबाल त्यांना पुत्र देण्यास तयार होत नाही. इकडे सत्यकाम आणि तपस्वीची बहीण प्रार्थना यांच्या प्रेमाचा अंकुर फुलतो. ती सून म्हणून जाबालला मान्य होते. शेवटी सत्याचा शोध, ईश्वर चिंतन करणारा सत्यकामला आचार्यांना त्यांनी दिलेल्या प्रश्नाची उकल होते. राज दरबारात सत्यकाम सांगतो की, ''जसे निसर्गात बी टाकल्यानंतर अंकूर येतो, वृक्ष बहरते, त्यानंतर त्यावर पशुपक्षांसह सर्वच त्यावर हक्क दाखवतात त्याप्रमाणे मी कुणाचाही पुत्र नाही. मी आचार्यांसह सर्वांचाच मानसपुत्र आहे,'' अशी कथा या नाटकात अधोरेखित केली आहे. नेपथ्य, पार्श्वसंगीत, संगीतसाथ चांगली झाली. नाटकातील नाट्यपदांना रसिकांनी दाद दिली. दिग्दर्शन आणि रंगभूषेमध्ये अनेक त्रुटी जाणवल्या. पात्र निवड साजेशी वाटत नव्हती. गायिका जाबाल ही मुळातच त्या वयाची होती; मात्र तिची रंगभूषा ''अप'' करून चेहरा साजेसा दिसत नव्हता. रंगभूषेला साजेशी प्रकाशयोजना आणि नेपथ्य करताना रंगसंगतीचा विचार होणे अपेक्षित होते. प्रार्थनेचे पात्र रंगवणारी मधुरा सोमण हिचा रंगमंचावरील वापर, शब्दफेक आणि गाणं उत्तम वाटलं.
-------

पात्र परिचय
नटी ः शमिका जोशी, सूत्रधार ः श्रीनिवास जोशी, तपस्वी ः गणेश जोशी, प्रार्थना ः मधुरा सोमण, जाबाल ः मनाली डोंगरे, राजवंशी ः अनिकेत आपटे, सत्यकाम ः आशुतोष मोडक, धनवंत ः मनोहर जोशी, सूरमणी ः राम तांबे, आचार्य ः प्रदीप तेंडुलकर.
------
सूत्रधार आणि साह्य
निर्मिती प्रमुख ः श्रीनिवास जोशी. ऑर्गन साथ ः चैतन्य पटवर्धन, तबला ः प्रथमेश शहाणे, नेपथ्य व रंगभूषा ः रामदास मोरे, नेपथ्य साहाय्य ः मोहन धांगडे, किशोर नेवरेकर, सुधाकर घाणेकर, संजय लोगडे, सौरभ लोगडे. प्रकाशयोजना ः मंगेश लाकडे, पार्श्वसंगीत ः प्राजक्ता जोशी, वेशभूषा ः प्राजक्ता जोशी, मुक्ता जोशी, अर्चना जोशी.
-----
आजचे नाटक
नाटक ः संगीत एकच प्याला. सादरकर्ते ः नाट्यसंपदा, गोवा. स्थळ ः स्वातंत्र्यवीर, वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी. वेळ ः सायंकाळी ७ वाजता.
--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com