जिल्ह्यात वीजबिल थकबाकी वाढली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात वीजबिल थकबाकी वाढली
जिल्ह्यात वीजबिल थकबाकी वाढली

जिल्ह्यात वीजबिल थकबाकी वाढली

sakal_logo
By

53394

जिल्ह्यात वीजबिल थकबाकी वाढली

महावितरण ः कणकवली विभागात ३१ हजार थकबाकीदार

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ८ ः वीज वितरण कंपनीच्या वतीने ३१ मार्च अखेरपर्यंत थकीत वीज बिलधारकांना तात्काळ वीज भरणा करण्याचे आवाहन केले आहे. याचे कारण कणकवली विभागातील आचरा, देवगड, कणकवली, मालवण आणि वैभववाडी तालुक्यातील तब्बल ३१ हजार ४३० ग्राहकांची ३ कोटी ३० लाख रुपये वीज वितरणची बिले थकीत राहिली आहेत. यामध्ये घरगुती वीज ग्राहक, व्यावसायिक आणि उद्योगासाठी वापरलेल्या विजेची ही थकबाकी आहे.
गेल्या काही वर्षापासून वीज वितरण कंपनीने लोड शेडिंग शून्य टक्क्यावर आणले आहे. ग्राहकांना आवश्यक अशी वीज सातत्याने पुरवठा करण्याचा प्रयत्न आहे. असे असतानाही बहुतांशी ग्राहकांची वीज बिले थकीत आहेत. विज बिल थकीत झाल्यानंतर संबंधित वीज अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तात्काळ वीज जोड तोडणी केली जाते. ग्राहकांना याबाबत सूचना देऊन विज जोड काढून टाकला जात होता. त्यामुळे वीज वितरणची थकबाकीचे प्रमाण अलीकडच्या वर्षात कमी झाले आहे. वीज वितरण कंपनीने ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने वीज भरणा करण्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. याचाही फायदा वीज वितरण कंपनीला झाला आहे. मात्र, वीज बिल थकीत करण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढू लागले आहे. मागील दोन वर्षात कोरोनाचा कालखंड वगळता वीज वितरण कंपनीने थेटपणे कारवाईचा बडगा हाती घेतला आहे. याचे कारण सातत्याने वीज वितरण कंपनीला आर्थिक भर्दंड सहन करावा लागत आहे. परिणामी, वीज ग्राहकांच्या बिलामध्ये ही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विज वितरण कंपनीने ३१ मार्च अखेर सर्वांना विज बिल भरणा करण्याचे आवाहन केले आहे. थकीत असलेल्या ग्राहकांना दंडात्मकही कारवाई केली जाते.
कणकवली विभागात आचरा वीज वितरणच्या कार्यक्षेत्रात ४३७६ घरगुती ग्राहकांची २७ लाख रुपये येणे बाकी आहे तर २६२ व्यावसायिक ग्राहकांची ८ लाख आणि ६१ औद्योगिक ग्राहकांची १० लाख मिळून ६६९९ ग्राहकांची ४५ लाख रुपये थकबाकी आहे. देवगड विभागात घरगुती ७७०३ ग्राहकांची ४० लाख, व्यापारी ग्राहक ४३५ यांची १० लाख तर औद्योगिक १११ ग्राहकांची १९ लाख मिळून ६२४९ वीज ग्राहकांची ६९ लाख इतकी थकीत आहे. सर्वाधिक थकबाकी ही कणकवली तालुक्यातील ९६९५ घरगुती ग्राहकांची ७४ लाख, ९०० व्यावसायिकांची २८ लाख तर १०२ औद्योगिक ग्राहकांची १६ लाख मिळून १० हजार ६६१ ग्राहकांची १ कोटी १८ लाख रुपये वीज बिल थकीत आहेत. मालवण तालुक्यातील ४४६४ घरगुती ग्राहकांची ३४ लाख, ४४७ व्यावसायिकांची १६ लाख तर ६६ औद्योगिक ग्राहकांची ५ लाख मिळून ४९७ वीज ग्राहकांची ५४ लाखाची थकबाकी आहे. वैभववाडी तालुक्यातील ४४३७ वीज ग्राहकांची २५ लाख, व्यावसायिक ३५५ ग्राहकांची ९ लाख आणि ५२ औद्योगिक ग्राहकांची ९ लाख मिळून ४८४ वीज ग्राहकांची ४३ लाख रुपये थकीत आहेत. परिणामी, कणकवली विभागामध्ये ३ कोटी ३० लाखाची थकबाकी आहे. या तुलनेत कुडाळ विभागाच्या ३१ हजार ४४२ वीज ग्राहकांची २ कोटी ७७ लाख रुपये इतकी थकबाकी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६२ हजार ८७२ वीज ग्राहकांची सध्या स्थितीत ६ कोटी ६ लाख रुपये वीज बिल थकीत आहेत.
------
कोट
कोकणातील ग्राहक प्रामाणिक आहेत. या भागांमध्ये थकबाकीचे प्रमाण कमी आहे. मात्र, अलीकडच्या कालावधीत काही कारणास्तव थकबाकी वाढली आहे. ३१ मार्चपर्यंत थकीत बिल भरावे. वेळीच बिले भरली तर कारवाई होत नाही. महावितरणला सहकार्य करा.
- बाळासाहेब मोहिते, कार्यकारी अभियंता, महावितरण
-------
जिल्हातील स्थिती
एकूण ग्राहक - ६२ हजार ८७२
एकूण थकबाकी - ६ कोटी ३ लाख