कर्करोग तपासणी शिबिरात ३५ महिलांची तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्करोग तपासणी शिबिरात ३५ महिलांची तपासणी
कर्करोग तपासणी शिबिरात ३५ महिलांची तपासणी

कर्करोग तपासणी शिबिरात ३५ महिलांची तपासणी

sakal_logo
By

RATCHL८१.JPG ः
L८१३२८
चिपळूण ः आरोग्य शिबिरात मार्गदर्शन करताना ऑन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटरतर्फेच्या स्त्री कर्करोगतज्ज्ञ डॉ. तेजल गोरासिया.
-------------
कर्करोग तपासणी शिबिरात
३५ महिलांची तपासणी
चिपळूण, ता. ८ः महिलांमध्ये आढळून येणारे कर्करोगाचे प्रमाण लक्षात घेता येथील ऑन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटरतर्फे जागतिक कर्करोग दिनानिमित्त खास महिलांसाठी मोफत कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये मॅमोग्राफी (स्तन कर्करोग गाठीची प्राथमिक तपासणी) चाचणी करण्यात आली. ३५ वर्षांवरील अधिक महिलांनी ही वैद्यकीय तपासणी करून घेतली आहे.
या शिबिरात स्त्री कर्करोगतज्ञ डॉ. तेजल गोरासिया आणि डॉ. आत्माराम चौधरी यांनी महिलांची वैद्यकीय तपासणी केली. डॉ. गोरासिया म्हणाल्या, महिलांमधील कर्करोगाची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अनेक महिला सततच्या होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आजाराची लक्षणे बळावतात. बऱ्याचदा महिलांमध्ये पन्नाशी किंवा साठीनंतर कर्करोग होण्याची शक्यता अधिक वाढते. महिलांमध्ये प्रामुख्याने स्तनाचा आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचं प्रमाण वाढताना दिसून येत आहे. हे जाणून कर्करोगाचं वेळीच निदान व्हावे यासाठी जागतिक कर्करोग दिनानिमित्त महिलांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं. या शिबिराला महिलांनी चांगला प्रतिसाद दिली आहे.
गर्भाशय, स्तनांशी निगडित महिलांना त्रास जाणवत असेल तर त्याकडे महिलांनी दुर्लक्ष करू नये. कारण कर्करोगाचे जितक्या लवकर निदान होईल तितक्या लवकर रुग्ण बरा होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक महिलांनी ३५ शी ओलांडल्यानंतर दर वर्षाला मॅमोग्राफी आणि पॅपस्मिअर चाचणी करून घेणं गरजेचं आहे. या वेळी लाईफ केअर हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. इसहाक खतीब, संचालक डॉ. विष्णू माधव, डॉ. शमशुद्दीन परकार, डॉ. शाहिद परदेशी उपस्थित होते. शिबिर यशस्वी होण्यासाठी अभिजित सुर्वे आणि दिनेश यादव यांनी परिश्रम घेतले.