
दाभोळ-विद्यार्थ्यांकडून ढोलनाद करून सरकारचा निषेध
rat8p25.jpg
81364
दापोलीः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे धरणे आंदोलनाला बसलेले विद्यार्थी.
-----------
विद्यार्थ्यांकडून ढोलनाद
करून सरकारचा निषेध
दाभोळ, ता. ८ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कृषिसेवा परीक्षेतील केलेल्या बदलांमुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात अभ्यासक्रमातील बदलाविरोधात कृषी अभियंत्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा १५ वा दिवस आहे. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ढोलनाद करत विद्यार्थ्यांनी निषेध केला.
या आंदोलनाची शासनदरबारी दखल घेतली गेली नसल्यामुळे कृषी अभियंत्याच्या ताटातील घास काढून घेतला गेला असल्याची भावना विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. सुमारे अडीचशे विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. सरकार या विद्यार्थ्यांच्या धरणे आंदोलनाची दखल घेत नसल्याने विद्यार्थी १० फेब्रुवारीपासून उपोषणाला बसणार आहेत. या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पाठवण्यात आल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.