पान एक-मोटार-दुचाकी धडकेत एकजण जागीच ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-मोटार-दुचाकी धडकेत
एकजण जागीच ठार
पान एक-मोटार-दुचाकी धडकेत एकजण जागीच ठार

पान एक-मोटार-दुचाकी धडकेत एकजण जागीच ठार

sakal_logo
By

मोटार-दुचाकी धडकेत
एकजण जागीच ठार
पिसेकामतेत अपघात; महिला गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ८ ः येथील रेल्वे स्थानकाकडून मसुरे (ता. मालवण) येथील गावी जाताना समोरून येणाऱ्या मोटारीची दुचाकीला धडक बसून आज एक जण ठार झाला. कृष्णा अच्युत मसूरकर (वय ५८, मूळ रा. मसुरे, सध्या मुंबई) असे त्यांचे नाव आहे. त्यांची मेव्हणी वैभवी विजय तोडणकर (रा. मुंबई) गंभीर जखमी झाल्या. अपघात सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कणकवली-आचरा रस्त्यावर पिसेकामते येथील वळणावर झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः आचरा मार्गावर प्रमोद बाबाजी मयेकर (रा. बांदिवडे) मोटारीने (एमएच ०४ जीई ५५३६) घेऊन कणकवलीच्या दिशेने येत होते. कृष्णा मसूरकर दुचाकीने (एमएच ०७ केए ०४५७) कणकवली येथून मेव्हणी वैभवी यांच्यासह मसुरे येथे जात होते. पिसेकामते येथे अपघात झाला. त्यात मसुरकर ठार झाले. जखमी वैभवी यांनी वाहन चालकांनी येथील रुग्णालयात दाखल केले. पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. दोघेही रेल्वे तिकीट आरक्षणासाठी आले होते. उद्या (ता. ९) ते आणि त्यांचे नातेवाईक मुंबईला जाणार होते. आरक्षित तिकीट घेऊन ते मसुरे येथे परतत असताना हा अपघात झाला.