सावंतवाडी पोलिसांचे साळगावकरांकडून कौतुक

सावंतवाडी पोलिसांचे साळगावकरांकडून कौतुक

swt98.jpg
81524
बबन साळगावकर

सावंतवाडी पोलिसांचे
साळगावकरांकडून कौतुक
सावंतवाडी, ता. ९ः आंबोली घाटात घडलेल्या कराड येथील सुशांत खिल्लारे खून प्रकरणाचा सखोल तपास करणाऱ्या सावंतवाडी पोलिसांचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी कौतुक केले आहे. सर्व आरोपींना गजाआड करणाऱ्या पोलिस व वरिष्ठ अधिकाऱ्यांना शुभेच्छा देताना अशाच प्रकारे त्यांनी भविष्यातही काम करावे, असे त्यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.
साळगावकर यांनी त्यात म्हटले की, आंबोली घाटामध्ये काही दिवसांपूर्वी कऱ्हाड येथील सुशांत खिल्लारे यांचा मृतदेह टाकण्यात आला होता. हे प्रकरण सुरुवातीला साधे वाटत असले तरी नंतर यामध्ये गुंता वाढत गेला होता. या प्रकरणात अन्य आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सावंतवाडी पोलिसांनी तपासाची सूत्रे शीघ्र गतीने हाताळत यामधील आरोपींना गजाआड केले. एकूणच पोलिसांचा तपास पाहता ही कामगिरी कौतुकास्पद अशी आहे. यापुढेही पोलिसांनी आपल्या कामगिरीमध्ये सातत्य ठेवून उर्वरित प्रकरणांचाही तपास करावा आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा बिमोड करावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com