चिपळुणातील लोककला महोत्सवाची सांगता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळुणातील लोककला महोत्सवाची सांगता
चिपळुणातील लोककला महोत्सवाची सांगता

चिपळुणातील लोककला महोत्सवाची सांगता

sakal_logo
By

rat०९११.txt

बातमी क्र. .११ (टुडे पान ३ साठीमेन)

फोटो ओळी
-ratchl९१.jpg ः
८१५१५
चिपळूण ः अभिनेत्री अक्षता कांबळी यांच्या महिला दशावतारातील एक क्षण.
---
मालवणी बोलीतील गाऱ्हाणे लक्ष्यवेधी

लोककला महोत्सवाची सांगता ; महिला दशावतार सादरीकरणाने शेवट गोड
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ९ ः चिपळूण ही कोकणची सांस्कृतिक राजधानी, अनेक समंलेने, सांस्कृतिक, कला, क्रीडा महोत्सव चिपळूणने यशस्वी केले आहेत. चार दिवस रंगलेल्या लोककला महोत्सवाने चिपळूणच्या सांस्कृतिक क्षेत्रात मानाचा तुरा खोवला गेला असल्याची भावना ज्येष्ठ साहित्यिक, लोककला महोत्सव संयोजन समितीचे प्रमुख डॉ. तानाजीराव चोरगे यांनी व्यक्त केली. अष्टपैलू अभिनेत्री अक्षता कांबळी यांच्या महिला दशावताराने या लोककला महोत्सवाची सांगता झाली.

लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिर, अप्पासाहेब जाधव अपरांत संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यामने श्री देव जुना कालभैरव मंदिराच्या सागावकर मैदानावर सलग चार दिवस रंगलेल्या लोककला, खाद्य, पर्यटन महोत्सवाची सांगता बुधवारी झाली. या वेळी डॉ. चोरगे बोलत होते. समारोपप्रसंगी लोटिस्माचे अध्यक्ष डॉ. यतिन जाधव, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, लोटिस्माचे मार्गदर्शन प्रकाश देशापांडे, प्रा. संतोष गोनबरे, डॉ. विजय रिळकर, प्रशांत पाटेकर, विश्वस्त समीर शेट्ये, परशुराम सागावकर आदी उपस्थित होते.
शेवटच्या दिवशी सकाळी नमनाचा अनुबंध व शाश्वत पर्यटन या दोन महत्वाच्या विषयांवर परिसंवाद रंगला. सायंकाळी लोककला महोत्सवातील लोककला सादरीकरण कार्यक्रमाची सुरवात अष्टपैलू अभिनेत्री अक्षता कांबळी यांच्या खास मालवणी बोलीतील गाऱ्हाण्याने झाली. मुस्लिम गीते आणि खालू बाजा वादन मैनुद्दीन चौगुले व सहकाऱ्यांनी केले. यानंतर चिपळूण महिला मंडळाच्या कलकारांनी मंगळागौर नृत्य प्रकार सादर केले. यानंतर लोककला महोत्सवाचा समारोप झाला. या वेळी प्रा. संतोष गोनबरे यांनी कोकणातील लोककलांना व्यासपीठ मिळावे, पालघर ते सिंधुदुर्गपर्यंतच्या लोककला एकाच व्यासपिठावर सादर व्हाव्यात, त्या जगासमोर याव्यात, लोककलांचे एकत्रित संकलन व्हावे, आमचा असलेला उद्देश साध्य झाल्याचे सांगितले. डॉ. यतिन जाधव यांनी लोटिस्माच्यावतीने सहभागी सर्व कलाकार, सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले. कोकणचे सौंदर्य, खाद्यसंस्कृती जगभर पोहोचवणारे पर्यटनदूत आशुतोष बापट, वैभव सरदेसाई, प्रसाद गावडे, सचिन कारेकर यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मुक्तीसंग्राम, आंबेडकरी जलसा कोकरे येथील कलाकारांनी सादर केला. वैदिक लग्नगीते सुवर्णा पाथरे यांनी सादर केली. रवळनाथ नमनमंडळ रत्नागिरी यांनी घोरीप नृत्य सादर केले.

कलाकारांचा सन्मान...
लोककला जपण्यासाठी योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांचा सन्मान करण्यात आला. जाखडी-नमन लोककलेतील रानपाट येथील अर्जुन मोर्य, नमन-नाटक कलाप्रकारातील नारदखेरकीतील पांडुरंग बांद्रे, लोकगीतांची परंपरा जपणाऱ्या बावनदी येथील सुवर्णाताई पाथरे, सिंधुदुर्गातील पहिले महिला दशावतार सुरू करणाऱ्या कणकवलीतील अक्षता कांबळी, भेदिकी शाहिरी परंपरा जपणारे देवरूख-मुरादपूर येथील नारायण तथा आबा खेडेकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.