
काळा घोडा महोत्सव
rat०९२७.txt
बातमी क्र. २७ (टुडे पान ३ साठी, फ्लायर)
(फोटोची पट्टी टुडे पान ३ ला वरती घ्यावी)
फोटो ओळी
rat९p१६.jpg-
८१५६१
मुंबई : काळा घोडा कला महोत्सवातील काही मनमोहक कलाकृती. कावळा, घोड्याचे शिर, कार, विविध बंधनात गुंतलेली महिला, धाग्यांपासून साकारलेली रिक्षेची प्रतिकृती आणि पक्षी. (छायाचित्रे- सिद्धेश वैद्य, रत्नागिरी)
---
काळा घोडा महोत्सवाने भारावून गेला माहोल...
सिद्धेश वैद्य; मंत्रमुग्ध करणारी कलाजत्रा एकदा पाहाच
रत्नागिरी, ता. ९ : जेव्हा एखाद्या कलेला जत्रेचे स्वरूप येते आणि सगळे आबालवृद्ध त्याचा मनसोक्त आनंद लुटतात तेव्हाच खरंतर कलाजात्रा पार पडली असं म्हणता येईल. काळा घोडा आर्ट फेस्टिवल ही अशा प्रकारची कलाजत्रा मुंबईत सुरू आहे. यात विभिन्न कलाकार एकाच वेळी एकाच जागेवर आपल्या वेगवेगळ्या कला अगदी वेगवेगळ्या प्रकारे सगळ्या लोकांसमोर प्रत्यक्ष सादर करतात. हा माहोल भारावून टाकणारा आहे. विविध प्रकारचे संगीत कानाला जसे आनंद देते तसेच हे कलेचे सादरीकरण पाहून तर अगदी मंत्रमुग्ध होऊन गेलो, असे लेन्स आर्टचे छायाचित्रकार सिद्धेश वैद्य यांनी सांगितले.
काळा घोडा महोत्सवाला भेट दिल्यानंतर ते सकाळशी बोलत होते. त्यांनी सांगितले की, महोत्सवात नृत्य, संगीत, चित्रकला, हस्तकला, ग्राफिक्स आर्ट, सिनेमा, साहित्य याशिवाय अनेक कला प्रकारातील कलाकृती आहेत. याबद्दल भरपूर वर्षे ऐकून होतो. या वर्षी सहज मुंबईत जाणे होतेच तेव्हा काला घोडाच्या तारखा नजरेसमोर ठेऊन जायचेच असे ठरवले. पूर्ण एक दिवस या महोत्सवात भाग घेऊन कलाकृती पाहिल्या. काला घोडा चौकाच्या रस्त्यावर तर निरनिराळ्या प्रकारच्या कलाकृती पाहिल्या. नवनवीन कलाकार नवीन कलाप्रकार साकारत होते. चित्रकार चित्रे रेखाटत होते, भरपूर प्रकारचे हाती बनवलेल्या आणि इतर विविध कलांनी परिपूर्ण असे भरपूर स्टॉल्स लागले होते. बघणाऱ्यांची, फोटो काढणाऱ्याची, खरेदी करणाऱ्यांची अक्षरशः लगबग सुरू होती.
वैद्य यांनी सांगितले की, चित्रकलेची, फोटोग्राफीमधल्या विविध प्रकारांची प्रदर्शने होती. खाद्य प्रकारांमध्ये रेलचेल सुरू तर होतीच पण त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वर्कशॉप्स आणि व्याख्याने चालू होती. लागूनच असलेल्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आणि त्याला जोडून असलेल्या रस्त्यावर अक्षरशः हजारो चित्रांची प्रदर्शने भरली होती. छायाचित्रांवर आधारित वर्कशॉप्स चालू होती. बॉडी आर्ट तसेच हेअर स्टायलिंगवर आधारित काही कार्यक्रम देखील वाचनात आले. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय येथे साहित्य जत्रा भरली होती. विविध प्रकारच्या साहित्यावर आधारित व्याख्याने आणि पुस्तकांची मांडणी केलेली होती. लहान मुलांसाठी मातीच्या भांडीची प्रात्यक्षिके सुरू होती. एकंदरीत हा महोत्सव खूप काही देऊन गेला.
---
कलेच्या जत्रेचे मूर्तिमंत उदाहरण
आयोजकांनी सहजपणे कुठेही गोंधळ गडबड न करता लाखोंच्या जनसमुदायाला सांभाळत दाखवून दिले. काळा घोडा कला महोत्सव १९९९ पासून काळा घोडा संस्थेने सुरू केला होता. हा महोत्सव दक्षिण मुंबई परिसरात काळ्या घोड्याची मूर्ती असलेल्या ठिकाणी आयोजित केला जातो. हा महोत्सव विनामूल्य असतो.