डेरवणमध्ये क्रीडा महोत्सव 3 मार्चपासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डेरवणमध्ये क्रीडा महोत्सव 3 मार्चपासून
डेरवणमध्ये क्रीडा महोत्सव 3 मार्चपासून

डेरवणमध्ये क्रीडा महोत्सव 3 मार्चपासून

sakal_logo
By

rat०९३१.txt

(पान २ साठी)

डेरवणमध्ये ३ मार्चपासून क्रीडा महोत्सव

खेड, ता. ९ ः श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्यावतीने सलग नवव्या वर्षी क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ३ ते १० मार्च २०२३ दरम्यान शिवजयंतीनिमित्त रंगणाऱ्या डेरवण युथ गेम्स २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे.
चिपळूणजवळील डेरवणमधील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट-एसव्हीजेसीटीच्या भव्य क्रीडासंकुलात १८ खेळांच्या अटीतटीच्या लढतींसाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. अॅथलेटिक्स, जिम्नॅस्टिक्स, बॅडमिंटन, टेबलटेनिस, जलतरण, तिरंदाजी, नेमबाजी, बुद्धिबळ, कॅरम, देशी खेळांना प्रोत्साहन देण्याकरिता लंगडी, खो-खो, कबड्डी, मल्लखांब, योगा या वैयक्तिक खेळासह बास्केटबॉल, फुटबॉल, व्हॉलिबॉल या खेळांचा समावेश आहे. ऑलिम्पिकमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेला वॉल क्लाइम्बिंग ही साहसी खेळाची स्पर्धा यंदाही पाहण्यास मिळणार आहे.
भारतीय खेळ आणि ऑलिम्पिक खेळांचा संगम असणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील आठ हजारापेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. यंदाही विजेत्यांना पदके, चषक तसेच एकूण १६ लाख रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. १०२० पदके, ६५ करंडक स्पर्धेत खेळाडूंना बक्षिसरूपाने देण्यात येणार आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेण्याचे निश्चित केले आहे. विविध क्रीडाप्रकारात राज्यातील खेळाडूंचा चित्तथरारक खेळ कोकणवासियांना या स्पर्धेनिमित्त पाहण्याची पर्वणी मिळणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन ३ मार्चला शानदार समारंभाने होईल. समारोप १० मार्चला करण्यात येईल. स्पर्धेच्या प्रत्येक दिवशी संध्याकाळी क्रीडा मानसतज्ञ, आहारतज्ञ तसेच प्रशिक्षक आणि राष्ट्रीय खेळाडूंचा परिसंवाद व मुलाखतीचा कार्यक्रमही रंगणार आहे.
स्पर्धेत ८ वर्षाखालील ते १८ वर्षापर्यंतचे खेळाडू सहभागी होणार आहेत. १ मार्चपर्यंत प्रवेशनोंदणी सुरू राहणार असून, ऑनलाईन नोंदणी www.svjctsportsacademy.com सुरू झाली आहे.
--