दाभोळ ःपूल बांधून सार्वजनिक बांधकामने काय साधले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ ःपूल बांधून सार्वजनिक बांधकामने काय साधले
दाभोळ ःपूल बांधून सार्वजनिक बांधकामने काय साधले

दाभोळ ःपूल बांधून सार्वजनिक बांधकामने काय साधले

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat९p२६.jpg ः KOP२३L८१६११आंजर्ले ः वाहतुकीस त्रासदायक ठरणारा नवीन पूल.

पूल बांधून सार्वजनिक बांधकामने काय साधले?
आंजर्लेकरांचा सवाल ; रस्त्यापासून उंचीसह वळण
दाभोळ, ता. १० ः आंजर्ले येथील उभागर तिठा येथील पावसाचे पाणी जाण्यासाठी असलेले पूर्वीचे सिमेंटचे पाईप काढून त्या ठिकाणी नवीन छोटा पूल बांधण्यात आला आहे. हा पूल रस्त्यापासून उंच असल्याने व पुढे वळण असल्याने या ठिकाणी एसटी बस जाण्यास अडचण होत असून बसचालकांना बस वळवताना कमालीची कसरत करावी लागत आहे. अवजड वाहनांनाही हा पूल त्रासाचा ठरत आहे. हा पूल बांधून सार्वजनिक बांधकाम विभागाने काय साधले, असा प्रश्न आंजर्लेकर नागरिकांकडून विचारला जात आहे.
आंजर्ले येथून उभाआगरमार्गे केळशीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन महिन्यापूर्वी मोरीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू झाले होते. काम पूर्ण झाल्यावर काही दिवसांपासून एसटी बससेवा सुरू झाली असून, या मोरीवरून बस वळवताना चालकाला समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मोरीची उंची वाढवण्यात आल्याने या मोरीवरून बस वळवताना बस रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या आपल्या दुकानाच्या दिशेने कलंडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपले मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे पत्र आंजर्ले येथील व्यापारी मदन जैन यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे.

चौकशीची मागणी...
आंजर्ले येथील अनेक ग्रामस्थांनी या पुलाचे बांधकाम सुरू असताना ठेकेदाराला अनेकवेळा सूचना देऊनही तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याने त्याकडे दुर्लक्ष केले असून या चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी आपण सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे करणार असल्याची माहिती आंजर्ले येथील ग्रामस्थ व भाजपचे तालुकाध्यक्ष मकरंद म्हादलेकर यांनी दिली आहे.