खेड ः कोकणात व्यावसायिक मेळावे सतत होण्यासाठी प्रयत्न करणार

खेड ः कोकणात व्यावसायिक मेळावे सतत होण्यासाठी प्रयत्न करणार

फोटो ओळी
-rat9p37.jpg ः KOP23L81648
खेड ः खेडमध्ये आयोजित जेसी फेस्टिवलचे आमदार योगेश कदम यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
---------
कोकणात व्यावसायिक मेळाव्यासाठी प्रयत्न

आमदार योगेश कदम ; खेड येथे जेसी फेस्टिवलचे उद्घाटन
खेड, ता. ९ ः कोकणात व्यावसायिक मेळावे सतत होण्यासाठी आम्ही कोकणातील लोकप्रतिनिधी एकत्र येऊन प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार योगेश कदम यांनी येथे दिली. खेडमध्ये आयोजित जेसी फेस्टिवलचे आमदार योगेश कदम यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
खेडमध्ये सलग ६ दिवस सेलिब्रिटींच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन जेसी या संघटनेने केले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार योगेश कदम, विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे, अजय बिरवटकर, उपविभागीय पोलिस अधिकारी शाशिकिरण काशीद, जेसी कार्यक्रम प्रमुख अमित कदम यांच्यासह सर्व संघटना सदस्यांच्या उपस्थितीत जेसी फेस्टीव्हलचे उद्घाटन झाले. या वेळी आमदार कदम म्हणाले, कोकणातील व्यावसायिकांना व्यासपीठ मिळून आर्थिक उलाढाल घडावी यासाठी सातत्याने व्यावसायिक मेळावे आयोजित होणे आवश्यक आहे. आनंदमेळा, सांस्कृतिक कार्यक्रम, कोकणी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, विविध आकर्षक वस्तू आणि खेळण्यांची दुकाने यातून मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण होत असल्याने त्याचा लाभ होऊ शकतो. कोकणातील नव्या पिढीचे आम्ही लोकप्रतिनिधी असून आम्ही जरी वेगवेगळ्या पक्षात काम करत असलो तरी कोकणच्या हिताच्या विषयांसाठी एकत्र येऊन काम करण्याची आमची मानसिकता आहे. शासनामार्फत अशा प्रकारच्या उपक्रमांना पाठबळ कसे देता येईल यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू, असे आश्वासन या वेळी आमदार कदम यांनी दिले. या महोत्सवात सौंदर्यवती स्पर्धा, सदाबहार गीतांचा कार्यक्रम, लकी ड्रॉ आणि मनोरंजनासाठी अनेक कार्यक्रम होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com