भात खरेदीसाठी 15 पर्यंत मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भात खरेदीसाठी 15 पर्यंत मुदतवाढ
भात खरेदीसाठी 15 पर्यंत मुदतवाढ

भात खरेदीसाठी 15 पर्यंत मुदतवाढ

sakal_logo
By

भात खरेदीसाठी १५ पर्यंत मुदतवाढ
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यामध्ये शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हंगाम २०२२-२३ मधील भात खरेदीला १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी शासकीय भात खरेदी केंद्रावर नोंदणी केलेली आहे, त्यांनी तत्काळ भात खरेदी केंद्रावर विक्री करावे, असे आवाहन जिल्हा मार्केटींग अधिकारी अनिल देसाई यांनी केले आहे. नोव्हेंबरपासून एकूण ३९ केंद्रांवर भात खरेदी सुरू असून यासाठी शासनाकडून ३१ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. जानेवारीअखेर जिल्ह्यातील ३०१ शेतकऱ्यांची भात खदी झालेली नाही. त्यामुळे १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ३ ते ८ फेब्रुवारीपर्यंत झालेली भात खरेदी पाहता खरेदीचे प्रमाण अत्यल्प आहे. शासनाकडून यापुढे भातखरेदीस मुदतवाढ मिळणार नाही, अशी माहिती देसाई यांनी दिली.
..............
शिष्यवृत्ती अर्जांबाबत आवाहन
सिंधुदुर्गनगरी : भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी प्रणालीवर २०२२-२३ करिता भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जाचे नूतनीकरण करण्यासाठी महाविद्यालयातील अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवगासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली. जे विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जांचे नूतनीकरण त्वरित करून घ्यावे. महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जांची छाननी करून परिपूर्ण अर्ज मंजुरीसाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालयाकडे वर्ग करण्याची कार्यवाही संबंधित प्राचार्यांनी तत्काळ कार्यवाही करावी. नवीन अर्ज नोंदणी व अर्ज नूतनीकरणाबाबत समस्या उद्भवल्यास सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे संपर्क साधावा.