
हळवल फाट्यावर उद्या होणार ठिय्या आंदोलन
हळवल फाट्यावर उद्या
होणार ठिय्या आंदोलन
कणकवली, ता. ९ : अपघात प्रतिबंधक उपाययोजना होत नसल्याने, मुंबई गोवा महामार्गावरील हळवल फाटा येथे उद्या (ता.१०) ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते बाळू उर्फ विनायक मेस्त्री यांनी दिला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर श्री.मेस्त्री यांना कणकवली पोलीसांनी प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावली आहे.
शहरातून जाणाऱ्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हळवल फाटा येथे सातत्याने अपघात होत आहेत. गेल्या दीड वर्षात आत्तापर्यंत नऊ जणांचा अपघातात बळी गेला आहे. या ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. हे अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने ९ फेब्रुवारीपर्यंत कार्यवाही करावी, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते बाळू मेस्त्री यांनी २५ जानेवारीला लेखी निवेदनाद्वारे दिला होता. मात्र महामार्ग विभागाकडून अपघात प्रतिबंधाबाबत कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे उद्या (ता. १०) फेब्रुवारीला हळवल फाटा येथे नागरिकांसह ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते बाळू मेस्त्री यांनी दिला आहे. तर ठिय्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कणकवली पोलिसांनी बाळू मेस्त्री यांना कलम १४९ नुसार प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावली आहे.