वैभववाडी पंचायत समिती चॅम्पियन

वैभववाडी पंचायत समिती चॅम्पियन

swt१०२.jpg
81736
सिंधुदुर्गनगरीः जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक गुण मिळविलेल्या वैभववाडी पंचायत समितीला चॅम्पियन ट्रॉफी प्रदान करताना प्रशासक प्रजित नायर, सोबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, विशाल तनपुरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वल्लरी गावडे व अन्य.

वैभववाडी पंचायत समिती चॅम्पियन
क्रिडा महोत्सवः जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १०ः आठ पंचायत समित्यांसह जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या क्रीडा महोत्सवात सवाधिक ८७ गुण मिळवत वैभववाडी पंचायत समितीने चॅम्पियनशीप मिळविली. सावंतवाडी पंचायत समितीने ७४ गुणांसह द्वितीय तर कुडाळ पंचायत समितीने ७१ गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला आहे. यशस्वी तालुका पंचायत समित्यांचे जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी अभिनंदन केले आहे.
पुरुष गटातील १०० मीटर धावणे स्पर्धेत सुनील कोंदले-देवगड, अमित गायकवाड-दोडामार्ग, प्रसाद देसाई-दोडामार्ग यांनी प्रथम तीन क्रमांक मिळविले. २०० मीटर धावणे स्पर्धेत सुनील कोंदले-देवगड, समीर राऊळ-कुडाळ, प्रसाद देसाई-दोडामार्ग हे प्रथम तीन विजेते ठरले. ४०० मीटर धावणे स्पर्धेत विजय शिंदे-सावंतवाडी, प्रसाद देसाई-दोडामार्ग, संकेत सावंत-कुडाळ हे विजेते ठरले. लांब उडीमध्ये संतोष पेडणेकर-कुडाळ, सुनील कोंदले-देवगड, नितीन सावंत- सावंतवाडी हे प्रथम तीन विजेते ठरले. उंच उडीमध्ये नितीन सावंत-सावंतवाडी, अमित खामकर- देवगड, नारायण गावडे-कुडाळ हे विजयी ठरले. गोळा फेकमध्ये निवास जाधव-वैभववाडी, अमित देसाई-कुडाळ, पांडुरंग हांडे-सावंतवाडी हे प्रथम विजेते ठरले. थाळी फेकमध्ये आदित्य कदम- देवगड, विवेक जाधव-कणकवली, निवास जाधव-वैभववाडी यांनी प्रथम तीन क्रमांक मिळविला. भाला फेकमध्ये विवेक जाधव-कणकवली, राजेंद्र चौधरी-मालवण, बाळासाहेब कोलते-वैभववाडी, बुद्धिबळमध्ये प्रदीप पाटील-वैभववाडी, पंढरीनाथ तेंडोलकर-कुडाळ, एकेरी कॅरम स्पर्धेत शंकर चव्हाण-वैभववाडी, राजन खरावे-सावंतवाडी हे विजयी झाले. दुहेरी कॅरम स्पर्धेत शंकर चव्हाण आणि देवेंद्र सावंत-वैभववाडी विजेता तर अर्जुन रणशुर आणि राजन खरावे-सावंतवाडी उपविजेता ठरले. एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत सिताकांत झालबा-वेंगुर्ले विजेता आणि विवेक शिरसाट-वेंगुर्ले उपविजेता ठरले. दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत सिताकांत झालबा आणि विवेक शिरसाट वेंगुर्ले विजेता तर संतोष पेडणेकर आणि मैमुद्दिन शेख-कुडाळ उपविजेता ठरले. रस्सीखेच स्पर्धेत वैभववाडी विजेता, कुडाळ उपविजेता, व्हॉलीबॉल स्पर्धेत मालवण विजेता आणि देवगड उपविजेता, खो-खो स्पर्धेत वैभववाडी विजेता आणि देवगड उपविजेता, लंगडी स्पर्धेत सावंतवाडी विजेता आणि मुख्यालय उपविजेता, कबड्डी स्पर्धेत देवगड विजेता आणि वैभववाडी उपविजेता तर क्रिकेट स्पर्धेत देवगड विजेता आणि दोडामार्ग उपविजेता ठरले.
महिलांच्या स्पर्धेतील १०० मीटर धावणे स्पर्धेत सुचिता घाडी-मुख्यालय, प्राची रावराणे-वैभववाडी, पल्लवी जाधव-वेंगुर्ले, २०० मीटर धावणे स्पर्धेत मनाली कोरगावकर-सावंतवाडी, शीतल कदम- वैभववाडी, चैताली मसुरकर-कुडाळ, ४०० मीटर धावणे स्पर्धेत प्राची रावराणे-वैभववाडी, सदिच्छा कसालकर-सावंतवाडी, रेखा धावले-वैभववाडी, उंच उडीमध्ये अनुष्का पाटकर-कुडाळ, सपना गायकवाड-सावंतवाडी, सुरेखा चव्हाण-सावंतवाडी, गोळा फेकमध्ये सुष्टी तांडेल-वेंगुर्ले, मनाली कोरगावकर-सावंतवाडी, राधिका परुळेकर-कुडाळ, थाळी फेक स्पर्धेत मनाली कोरगावकर-सावंतवाडी, रेश्मा वरसकर-वेंगुर्ले, चेतना म्हाडगुत-कुडाळ, भाला फेक स्पर्धेत प्राची गवस-दोडामार्ग, शीतल मयेकर-देवगड, दीक्षा माळकर-कुडाळ, बुद्धिबळ स्पर्धेत पुनम हजारे- मालवण, अमिषा कुंभार-सावंतवाडी, एकेरी कॅरम स्पर्धेत रसिका तांबे-कणकवली, मृणाल कदम- कणकवली, दुहेरी कॅरम स्पर्धेत रसिका तांबे आणि सायली कदम-कणकवली विजेता तर रेणुका शिंदे आणि विनिता रायकर-कुडाळ उपविजेता, एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत स्नेहल बेलसरे-मालवण, पूनम खोटारे-दोडामार्ग, दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत स्नेहल बेलसरे आणि लता वंजारे-मालवण विजेता आणि स्नेहा कांबळी आणि सुषमा खराडे-मुख्यालय उपविजेता, रस्सीखेच स्पर्धेत कुडाळ विजेता आणि मालवण उपविजेता, खो-खो स्पर्धेत वैभववाडी विजेता आणि सावंतवाडी उपविजेता, लंगडी स्पर्धेत मुख्यालय विजेता आणि सावंतवाडी उपविजेता, कबड्डी स्पर्धेत वैभववाडी विजेता आणि कणकवली उपविजेता, क्रिकेट स्पर्धेत कुडाळ विजेता आणि वेंगुर्ले उपविजेता ठरले.
----------
चौकट
दिव्यांग कर्मचाऱ्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद
यावर्षी प्रथमच दिव्यांग कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र स्पर्धा घेण्यात आली. यातील पुरुषांच्या बुद्धिबळ स्पर्धेत कुलदीप गवस-मुख्यालय, नंदकिशोर आचार्य-मुख्यालय प्रथम दोन विजेते ठरले. कॅरम स्पर्धेत संतोष कांबळे-कणकवली विजेते, अनिल कदम उपविजेता ठरले. गोळा फेक स्पर्धेत कुलदीप गवस, नंदकिशोर आचार्य, अनिल कदम, भाला फेक स्पर्धेत नंदकिशोर आचार्य, अनिल कदम, कुलदीप गवस विनोद खंडागळे, नंदकिशोर गवस तर महिलांच्या गटात थाळी फेकमध्ये अश्विनी सावंत-देवगड, वंदना सावंत-सावंतवाडी, सुरेखा परब-सावंतवाडी, भाला फेकमध्ये सुरेखा परब, अश्विनी सावंत, गोळा फेकमध्ये अश्विनी सावंत, वंदना सावंत, बुद्धिबळमध्ये कुंदा बोंडाळे-देवगड, सुरेखा परब-सावंतवाडी तर कॅरम स्पर्धेत अश्विनी सावंत-देवगड आणि कुंदा बोंडाळे-देवगड विजेते ठरले आहेत.
---------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com