
कुडाळात 26 फेब्रुवारीला युवा महोत्सव
कुडाळात २६ फेब्रुवारीला युवा महोत्सव
परब मित्रमंडळतर्फे आयोजन ः सहभागाचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १० ः धीरज परब मित्रमंडळाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी जिल्ह्यातील महाविद्यालयीन युवकांसाठी युवा महोत्सवाचे आयोजन केले आहे. हा महोत्सव २६ ला सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत येथील वासुदेवानंद ट्रेड सेंटर उद्यमनगर (हॉटेल आरएसएनच्या मागे) होणार आहे. मुलांच्या व युवकांच्या कलागुणांना मनोरंजनाबरोबरच एक व्यासपीठ मिळावे, कलागुणांना वाव मिळाला, हा या मागचा हेतू असून यात सहभागी होण्याचे आवाहन मंडळाकडून केले आहे. धीरज परब मित्रमंडळाच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतीक, शैक्षणिक तसेच आरोग्यविषयक शिबीरे आयोजित करण्यात येतात. याही जिल्ह्यातील महाविद्यालयीन युवकांसाठी युवा महोत्सवाचे आयोजन केले आहे.
स्पर्धेचे स्वरुप असेः समुह नृत्य स्पर्धा, स्कीट स्पर्धा, एकेरी नृत्य स्पर्धा, एकेरी गायन स्पर्धा तसेच ‘विनर ऑफ दि कॉलेजीस’ अर्थात मानाचा करंडक देऊन विजेत्या कॉलेजला सन्मानीत करण्यात येणार आहे. प्रेक्षक व सहभागी विद्यार्थ्यांसाठी दुपारी अल्पोपहारची व्यवस्था करण्यात आली आहे. वेळेअभावी प्रवेश मर्यादीत असून नाव नोंदणी २३ पर्यत सायंकाळी ५ पर्यत करावयाची आहे. सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाला प्रशस्तिपत्र देण्यात येणार असून सहभागी विद्यार्थ्यांना आधारकार्ड व कॉलेजच ओळखपत्र दाखवणे बंधनकारक राहणार आहे. उपस्थित प्रेक्षकांमधून लकी ड्रॉ आकर्षक बक्षिसे असणार आहेत. अधिक माहितीसाठी सचिन गुंड, वेदांग कुडतरकर यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त युवकांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.