
सं. एकच प्यालातून उलगडला सुधाकरचा जीवनपट
rat१०१८. txt
(टुडे पान २ साठी, अॅंकर)
सं. राज्य नाट्य स्पर्धा--लोगो
फोटो ओळी
-rat१०p५.jpg-
८१७४१
ओळी ः नाट्य संपदा गोवा या संस्थेने सादर केलेल्या संगीत एकच प्याला या नाटकातील एक क्षण (नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)
----
एकच प्यालातून उलगडला सुधाकरचा जीवनपट
नाट्यपदांना रसिकांची दाद ः नाट्य संपदा गोवा संस्थेचा प्रयत्न
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० ः एक बुद्धीमान, तेजस्वी स्वाभिमानी माणूस मद्याच्या आहारी गेल्यावर संसाराचा नाश कसा करतो. हे संगीत एकच प्याला या नाटकातून लेखक राम गणेश गडकरी यांनी आपल्या प्रभावी भाषेतून मांडले आहे. त्यांच्या लेखणीतील अजरामर नाटकाचा प्रयोग सं. राज्य नाट्य स्पर्धेत नाट्य संपदा- गोवा या संस्थेने केला. या नाटकाचे संगीत दिग्दर्शन गोविंद मराठे यांनी केले. वि. स. गुर्जरांनी लिहिलेल्या खासकरुन सिंधू आणि रामलाल यांच्या नाट्यपदांना रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. मद्याच्या आहारी गेल्याने होणारे दुष्परिणाम आणि विद्या संपन्न सुधाकराचे कौटुंबिक जीवन दाखविण्यास संस्था यशस्वी झाली.
---
काय आहे नाटक?
संगीत एकच प्याला हे या नाटकाचे दिग्दर्शन नाट्य संपदा या संस्थेचे चंद्रशेखर गवस यांनी केले आहे. नाटकाची सुरवात विद्या संपन्न सुधाकर आणि सिंधू आणि त्याचा मित्र रामलाल यांच्या प्रवेशाने होते. रामलाल परदेशी जातो. गडगंज संपत्तीत वावरणाऱ्या सिंधू आणि सुधाकर यांचे वैवाहिक जीवन सुरू होते. एक दिवशी तिचा भाऊ पद्माकर सिंधूला माहेरी नेतो ती परत येते आणि त्याच कालावधीत सुधाकराची वकिलीची सनद काही दिवसांकरिता रद्द केली जाते. मनाने खचलेल्या सुधाकर तळीरामाला ही गोष्ट सांगतो. दुःख विसरण्यासाठी तळीराम त्याला मद्याचा एकच प्याला देतो. मद्याच्या आहारी गेलला सुधाकर अखेर तळीरामाच्या आर्य मदिरा मंडळाचा सदस्य होतो. मद्यात बुडून जातो. तळीराम आणि सुधाकर घरातच मद्य प्राशन करतात. त्यावेळी तळीराम रामलाल व पद्माकर यांना घरातून बाहेर काढण्यास सांगतो व सिंधूला शपथ घेण्यास भाग पाडतो. त्याप्रमाणे सुधाकर करतो. पतिव्रता सिंधू हे सगळं करते. अखेरीस मद्यात डुंबलेल्या वकिल सुधाकर सनद घेण्यासाठी ऑफिसला जातो. तिथेही धिंगाणा करतो. सनद कायमची रद्द केली जाते. घरची परिस्थिती हलाखीची येते. सिंधू लोकांचे दळण करुन छोट्या मुलाचे संगोपन करते. एके दिवशी मद्यधुंद सुधाकर लहानमुलाला पाळण्यात गळा आवळून मारतो. सिंधूला ढकलल्याने तिच्या डोक्याला मोठी जखम होते. त्यावेळीही सुधाकराला सिंधू पाठीशी घालते. ती पतिव्रता राहते आणि सुधाकर मद्याच्या नशेत स्वतःचा नाश करतो. मद्य प्राशनामुळे होणारे दुष्परिणाम यांचा लेखा जोखा दाखविण्यास संस्था यशस्वी झाली. अभिनय, नेपथ्यात रंगत जाणाऱ्या या नाटकातील नाट्यपदांना रसिकांनी दाद दिली.
--
* पात्र परिचय
सुधाकर ः सर्वेश परब. सिंधू ः उर्वी फडके, रामलाल ः गोविंद मराठे, भगीरथ ः हेमंत केरकर, गीता ः विभा वझे, खुदाबक्ष ः अजय परब. हुसेन ः योगेश केणी. मन्याबापू ः सर्वेश बीचोलकर, डॉक्टर ः राम परब. फौजदार ः भक्तेश नाईक, मगन ः कौशिक नाईक. भाईसाहेब ः शेखर परब. तळिराम ः शेखर गवस, पद्माकर ः शैलेश नाईक, शास्त्री ः सचिन आसोलकर, जनुभाऊ ः अभिषेक माळगावकर, रावसाहेब ः नितीन परब, वैद्य ः महादेव नाईक, सोन्याबापू ः शुभेश मणेरीकर, भाऊसाहेब ः ओंकार गडेकर, दादासाहेब ः विशाल नाईक, बाबासाहेब ः मनोज गवस.
------
* सूत्रधार आणि साह्य
ऑर्गन साथ ः आनंद नाईक, तबला साथ ः सुविशांत बोर्डेकर, पार्श्वसंगीत ः अद्वैत वझे, रंगभूषा ः सारंग केरकर, नेपथ्य ः विराज परब व श्रीजा आसोलकर, प्रकाश योजना ः सर्वज्ञ परब, वेशभूषा ः हिमांशू परब, ओवी गवस.
-----
आजचे नाटक
नाटक ः संगीत त्रिवेणी. सादरकर्ते ः चौपाटी कारंजा मित्र मंडळ, अहमदनगर ः स्वातंत्र्यवीर, वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी. वेळ ः सायंकाळी ७ वाजता.
--