
बांधकामचे नवे कार्यालय हळवल येथे होणार
kan१०३.jpg
८१७७४
कणकवली : शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत असलेले सार्वजनिक बांधकामचे कार्यालय हळवल येथे स्थलांतरीत होणार आहे.
बांधकामचे कार्यालय
हळवल येथे होणार
३ कोटी ९८ लाखाच्या खर्चाला मंजूरी; सर्वगोड यांची माहिती
कणकवली, ता. १० : सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे नवे कार्यालय शहरापासून दोन किलोमिटर अंतरावरील हळवल येथील जागेत बांधले जाणार आहे. त्यासाठी ३ कोटी ९८ लाख रूपये खर्चाला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंजुरी दिली आहे. याबाबतची माहिती कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी दिली.
श्री. सर्वगोड म्हणाले, बांधकामच्या कणकवली कार्यालयाअंतर्गत ५ उपविभाग येतात. या उपविभागाकडे ९०६ किलोमीटर लांबीचे रस्ते तसेच जिल्हा मुख्यालयातील सर्व इमारती व तीन तालुका मुख्यालयातील इमारती देखभाल दुरूस्तीसाठी आहेत. कणकवली येथील विभागीय कार्यालयाची बहुतांश जागा ही पनवेल पणजी, राज्यमार्ग क्रमांक ६६ च्या चौपदरीकरणाच्या कामात गेली. त्यामुळे कणकवली शहरात असलेल्या कार्यालयातील जागा कामकाजासाठी अपुरी पडत आहे, त्याचबरोबर पार्किंगची समस्यादेखील गंभीर आहे.
ते म्हणाले, कार्यालयाची आता असलेली इमारत फार जुनी आहे. त्यामुळे हे कार्यालय स्थलांतर करून नवीन इमारतीमध्ये कामकाज करणे आवश्यक होते. स्थानिक लोकप्रतिनिधींकडून देखील तशी मागणी होत होती. त्यानुसार मुख्य वास्तू शास्त्रज्ञ यांच्याकडून प्राप्त नकाशानुसार अंदाजपत्रक तयार करण्यात आले. त्यानुसार या कामाला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंजुरी दिली आहे.