राजापूर-गाळ उपशासाठी निधी संकलन समिती

राजापूर-गाळ उपशासाठी निधी संकलन समिती

फोटो ओळी
-rat१०p१६.jpg ः KOP२३L८१७५४ राजापूर ः गाळ उपशाचे सुरू असलेले काम.
-------------

गाळ उपशासाठी निधी संकलन समिती

अर्जुना-कोदवली नदी ; कामावर देखरेखीसाठीही राजापुरात समिती
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १० ः शहरातील अर्जुना-कोदवली नद्यांमध्ये वर्षानुवर्षे साचलेल्या गाळाचा उपसा करण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. नाम फाउंडेशन, महसूल-नगरपालिका यांचा पुढाकार अन् सहकार्य आणि लोकसहभागातून होत असलेल्या गाळ उपशाच्या कामासाठी जास्तीत जास्त लोकवर्गणीतून निधीची उभारणी करण्याचा निर्धार प्रांताधिकारी वैशाली माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये करण्यात आला. या वेळी निधी संकलनासाठी निधी संकलन समिती तर गाळ उपशाच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठीही देखरेख समितीही गठित करण्यात आली आहे.
नगर पालिकेमध्ये प्रांताधिकारी माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला तहसीलदार शीतल जाधव, पालिकेचे मुख्य लिपिक जितेंद्र जाधव, व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, प्रशांत पवार, रमेश पोकळे, अर्बन बँक संचालक विवेक गादीकर, दिनानाथ कोळवणकर, प्रतिभा रेडीज, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष संजय पवार, मजिद पन्हळेकर, माजी उपनगराध्यक्ष विजयराव हिवाळकर, डॉ. उत्तम प्रभुदेसाई, मंदार कानडे, नागेश शेट्ये, चारूदत्त कदम, श्रुती ताम्हणकर, अनामिका जाधव, श्यामला कुलकर्णी, शुभांगी सोलगावकर, महेश शिवलकर, जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बंदरधक्का परिसर, आयटीआय परिसर, खर्ली पात्र आदी परिसरातील गाळाचा उपसा सुरू आहे. गाळ उपशासाठी जिल्हा नियोजनमधून उपलब्ध झालेल्या निधीसह गोळा झालेल्या लोकवर्गणीतून विविध प्रकारचा खर्च केला जात आहे.
------------
चौकट
निधी संकलन समिती
अध्यक्ष -महादेव गोठणकर, उपाध्यक्ष- विजय हिवाळकर, सदस्य - व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, दिनानाथ कोळवणकर, प्रशांत पवार, संजय पवार, दिलीप अमरे, मजिद पन्हळेकर, श्रुती ताम्हणकर, प्रतिभा रेडीज, शुभांगी सोलगावकर, कल्याणी रहाटे, शीतल पटेल, संगीता चव्हाण.
----------
चौकट
देखरेख समिती
अध्यक्ष-चारूदत्त कदम, उपाध्यक्ष- मंदार कानडे, प्रकाश उर्फ बाळा तांबट, जगदीश पवार, प्रकाश लोळगे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com