
सिंधुदुर्ग किल्ल्यावर 19 ला ठाकरे शिवसेनेतर्फे शिवजयंती
सिंधुदुर्ग किल्ल्यावर १९ ला
ठाकरे शिवसेनेतर्फे शिवजयंती
शिल्पा खोतः वेषभूषा स्पर्धेचेही आयोजन
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १०ः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने १९ ला शासकीय शिवजयंती उत्सव किल्ले सिंधुदुर्ग येथे आमदार वैभव नाईक व शिवप्रेमींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने शिव चरित्रावर आधारित वेषभूषा स्पर्धेचे आयोजनही केले आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर किल्ले परिसर भगवामय करण्यात येणार असल्याची माहिती कुडाळ-मालवण विधानसभा युवती सेना प्रमुख शिल्पा खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिवसेना शाखा कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी महिला आघाडी उपतालुकाप्रमुख अंजना सामंत, नंदा सारंग, युवती सेना तालुका प्रमुख निनाक्षी शिंदे, उपतालुकाप्रमुख रूपा कुडाळकर, विद्या फर्नांडिस, मंदा जोशी, दीपाली पवार, आर्या गावकर, दीक्षा गावकर, प्रज्ञा कदम, रिया आचरेकर, संतोष अमरे, माजी नगरसेवक यतीन खोत, सिद्धेश मांजरेकर, सुरेश मडये उपस्थित होते.
शिवजयंती सोहळ्याच्या निमित्ताने किल्ले सिंधुदुर्ग येथे शिवजन्म क्षण सोहळा सादर होणार आहे. दरवर्षीप्रमाणे ऐतिहासिक वेशभूषा परिधान करून शिवप्रेमी, महिला या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. जयंतीनिमित्त किल्ले सिंधुदुर्गवरील शिवराजेश्वर मंदिरात छत्रपतींना जिरेटोप प्रदान केला जाणार आहे. ५ ते १० वर्षे तसेच खुला गटासाठी शिवचरित्रावर आधारित वेशभूषा स्पर्धा आयोजित केली आहे. यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावे शिल्पा खोत, निनाक्षी शिंदे, आर्या गावकर यांच्याकडे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. या सोहळ्यात शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही केले आहे.