राजापूर अर्बनच्या अध्यक्षपदाची 16 ला निवड

राजापूर अर्बनच्या अध्यक्षपदाची 16 ला निवड

rat१०१४.txt

(पान २ साठी)

राजापूर अर्बन अध्यक्षपदाची गुरुवारी निवड

राजापूर, ता. १० ः सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बँक असलेल्या राजापूर अर्बन बँकेची नुकतीच निवडणूक झाली. बँकेच्या आता अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. गुरुवारी (ता. १६) ही निवड होणार आहे. निवडणुकीमध्ये सत्ताधारी सहकार पॅनेलने बहुमत मिळवून पुन्हा एकदा वर्चस्व राखले असल्याने अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीमध्ये सत्ताधारी सहकार पॅनेल बाजी मारणार असल्याचे निश्‍चित मानले जात आहे. त्यामध्ये सहकार पॅनेलकडून कोणाला संधी दिली जाणार ? याची साऱ्‍यांना उत्सुकता लागून राहिली आहे.
राजापूर अर्बन बँकेच्या संचालक मंडळाची नुकतीच निवडणूक झाली. १५ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीमध्ये सत्ताधारी सहकार पॅनेलने दहा चार जागा जिंकल्या आहेत. परिवर्तन पॅनेलने चार तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे. या संचालक निवडणुकीनंतर आता बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यासाठी येत्या गुरुवारी नवनिर्वाचित संचालकांच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी होणाऱ्‍या या निवडीमध्ये सकाळी ११ ते ११.१५ वा. नामनिर्देशन पत्र दाखल करणे, ११.१५ ते ११.२५ वा. दाखल अर्जांची छाननी करणे, ११.२५ ते ११.३५ वा. पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेणे, त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे मतदान घेणे अशी निवडणूक प्रक्रिया राहणार आहे.
अर्बन बँकेच्या संचालक मंडळावर सहकार पॅनेलचे वर्चस्व असल्याने अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये सहकार पॅनेलचे वर्चस्व राहणार असल्याचे मानले जात आहे. पहिल्या वर्षी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी अनुभवी चेहऱ्‍यांना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. सहकार पॅनेलने पाच वर्षासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी धोरण निश्चित केले असून सर्वानुमते पहिल्या एका वर्षासाठी हनिफ काझी यांना अध्यक्षपदासाठी, तर प्रसाद मोहरकर यांना उपाध्यक्षपदासाठी संधी देण्यात आली असल्याची माहिती सहकार पॅनेलचे प्रमुख अनिल ठाकूरदेसाई यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com