
बुरंबी प्राथमिक आरोग्यकेंद्राचे काम रखडले
rat१०२७.txt
(पान २ साठी)
फोटो ओळी
-rat१०p२३.jpg ः
८१७७९
संगमेश्वर ः बुरंबी प्राथमिक आरोग्य केंद्र
----
बुरंबी आरोग्यकेंद्राचे काम रखडले
संगमेश्वर, ता. १० ः वाशी आणि बुरंबी खोऱ्यातील रुग्णांना उपचाराची सुसज्ज सोय व्हावी यासाठी उभारण्यात येत असलेल्या अद्यावत अशा बुरंबी प्राथमिक आरोग्यकेंद्राचे काम रखडल्याने ठेकेदाराविरुद्ध नाराजी व्यक्त होत आहे. कोरोनाच्या कालावधीतच या आरोग्यकेंद्राचे काम मुदतीत पूर्ण होऊ न शकल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
खासदार विनायक राऊत आणि आमदार उदय सामंत यांच्या सहकार्यामुळे बुरंबी येथील प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या इमारतीला आणि वसतीगृहासाठी पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत; मात्र गेली दोन वर्ष हे काम रखडल्याने ठेकेदारविरुद्ध नाराजी व्यक्त होत आहे. बुरंबी पंचक्रोशीतील आणि वाशी खोऱ्यातील रुग्णांना उपचारासाठी बुरंबी प्राथमिक आरोग्य केंद्र उपयोगी आहे. गेली अनेक वर्ष येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रायभोळे यांनी रुग्णांना चांगली सेवा दिली आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. याच कालावधीमध्ये प्राथमिक आरोग्यकेंद्राचे काम रखडले गेले. त्यामुळे जवळच्या शाळेमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले. सद्यःस्थितीमध्ये प्राथमिक आरोग्यकेंद्र शाळेच्या इमारतीमध्ये सुरू आहे. गेली दोन वर्ष प्राथमिक आरोग्यकेंद्राचे काम रखडले असून ठेकेदाराविरुद्ध संताप व्यक्त होत आहे.
---