आचरा-डोंगरेवाडीतील महिलेची गळफास घेऊन आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आचरा-डोंगरेवाडीतील महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
आचरा-डोंगरेवाडीतील महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

आचरा-डोंगरेवाडीतील महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

sakal_logo
By

आचरा-डोंगरेवाडीतील
महिलेची आत्महत्या
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. १०ः डोंगरेवाडी येथील सुलोचना विजय चिरमुरे (वय- ६५) यांनी राहत्या घरात आत्महत्या केली. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली. याबाबतची खबर मुलगा भगवान चिरमुले यांनी आचरा पोलिसांना दिली. आचरा पोलीसात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
आचरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारः आचरा-डोंगरेवाडी येथील सुलोचना चुरमुरे या पतीसह डोंगरेवाडी येथील घरी राहत होत्या. त्यांना आजारपण होते. आज सकाळी त्यांचे पती विजय ऊर्फ बाळा चिरमुरे हे साडे सहा वाजता नेहमीप्रमाणे बाजारात गेले होते. साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घरी आल्यावर त्यांना पत्नी गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आली. या घटनेची माहिती त्यांनी जामडुल येथे राहत असलेल्या मुलाला दिली. त्याने या घटनेची माहिती आचरा पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शंकर कोरे, पोलीस उपनिरीक्षक हर्षाली पाटील, हवालदार संदीप कांबळे, मनोज पुजारे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. मुलाने याबाबत आचरा पोलीसात खबर दिली असून आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची आचरा पोलीसात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप कांबळे करत आहेत. सुलोचना यांच्यामागे पती, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.