पत्रकाराच्या मृत्यूप्रकरणी सखोल चौकशीची मागणी

पत्रकाराच्या मृत्यूप्रकरणी सखोल चौकशीची मागणी

rat१०३४.txt

( पान ५ साठी)

फोटो ओळी
-rat१०p३३.jpg ः
८१८२२
राजापूर ः राजापूर पत्रकार संघाच्यावतीने पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर यांना निवेदन देताना राजापूर पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व पत्रकार.
---
पत्रकाराच्या मृत्यूप्रकरणाची सखोल चौकशी करा

राजापूर, ता. ११ ः तालुक्यातील कोदवली पेट्रोलपंपानजीक कारच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करावी, अशी मागणी राजापूर पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन पत्रकार संघाच्या वतीने पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर यांना देण्यात आले. राजापूर पत्रकार संघाच्या बैठकीतही या अपघातप्रकरणी चर्चा करण्यात आली. यावेळी वारीशे यांना संघाच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते, ज्येष्ठ पत्रकार महेश शिवलकर, विनोद पवार, खजिनदार शरद पळसुलेदेसाई, सचिव राजेंद्र बाईत, सहसचिव प्रकाश नाचणेकर, सदस्य संतोष मोंडे, संतोष शिंदे, राजेंद्र जोगले, गोकुळ कांबळे, भास्कर खडपे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com