कनेडी राडा प्रकरणातील संशयितास कोठडी

कनेडी राडा प्रकरणातील संशयितास कोठडी

कनेडी राडा प्रकरणातील
संशयितास कोठडी
कणकवली, ता. १०ः शिवसेनेचे कार्यकर्ते कुणाल सावंत यांना भाजपचे कार्यकर्ते संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी मारहाण केल्यानंतर भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये कनेडी बाजारपेठेत झालेल्या राडा याप्रकरणी आज सात संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून चौघांना तर संदेश सावंत यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून तिघांना आणि सूर्यकांत उर्फ आप्पा तावडे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून तिघांना मिळून आज १० जणांना अटक केली होती. याती तिघांनाची काल (ता. ९) न्यायालयानी कोठडीत रवानगी झाली होती. आज सात संशयितांना येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे. भाजपचे अनिल राजाराम पांगम (रा. नाटळ) संतोष वसंत आग्रे (रा. फोंडाघाट), संदीप बाळकृष्ण गावकर (रा, सांगवे) आणि तुषार शामसुंदर गावकर (रा. सांगवे) यांचा समावेश आहे. तर एक दिवसाच्या पोलिस कोठडीत असलेले कुणाल विजय सावंत ( रा.सांगवे), योगेश रमाकांत वाळके (रा. कनेडीबाजार) मंगेश रामचंद्र सावंत ( रा. भिरवंडे) यांची ही न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com