संगीत तमसो मा ज्योतिर्गमय भक्तीरसात न्हाले

संगीत तमसो मा ज्योतिर्गमय भक्तीरसात न्हाले

rat१११०. txt

बातमी क्र.१० (पान ६ साठी, अॅंकर)

सं. राज्य नाट्य स्पर्धा--लोगो

फोटो ओळी
-rat११p११.jpg ः
८१९४४
रत्नागिरी ः दापोली तालुका ब्राह्मण हितवर्धिनी सभा या संस्थेने सादर केलेल्या संगीत तमसो मा ज्योतिर्गमय या नाटकातील एक क्षण. (नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)
----
संगीत तमसो मा ज्योतिर्गमय भक्तीरसात न्हाले

संत वेण्णास्वामींची जीवनपट ः दापोली तालुका ब्राह्मण हितवर्धिनी सभा यशस्वी

नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ ः समर्थ रामदास स्वामी यांनी आपल्या काळात संपूर्ण भारतभर हजारो निष्ठावंत स्त्री-पुरुष शिष्य निर्माण केले. त्यापैकी त्यांचीच एक पट्टशिष्या वेण्णास्वामी. वेण्णास्वामींचा जीवनपट नव्या कोऱ्या संहितेतून लेखक-दिग्दर्शक विलास कर्वे यांनी उलगडला. राज्यनाट्य स्पर्धेत सादर झालेल्या ''तमसो मा ज्योतिर्गमय'' या नाटकाला संगीत दिग्दर्शन निळकंठ गोखले यांनी दिले. उत्तम संगीत कौशल्यात रंगत जाणारे नाटक भक्तीरसात न्हाऊन गेले. परमार्थ, सद्गुरूप्रती निष्ठा, उपासना, समर्थाचा प्रवास उलगडण्यास दापोली तालुका ब्राह्मण हितवर्धिनी सभा यशस्वी झाली. नवीन पदरचना संगीत यांचा उत्तम मिलाफ साधल्याने रसिक मंत्रमुग्ध झाले. अभिनय, नेपथ्य, चरित्र रंगभूषा, परमार्थाची आस याचा चांगला मेळ प्रेक्षकांना पाहायला मिळाला.
--
काय आहे नाटक?

संगीत तमसो मा ज्योतिर्गमय या नव्या संगीत नाटकात समर्थ रामदास स्वामींच्या पट्टशिष्या संत वेण्णास्वामी. वेण्णा लहानपणापासून रामभक्त असते. त्या काळी बालविवाह पद्धत असल्यामुळे तिचे लग्न ठरलेले असते. आई-वडील गोपाजीपंत व राधाबाई वेण्णाला घेऊन मिरजला जाणार असतात. त्याचवेळी मिरजवरून निरोप मिळतो. वेण्णाचा पती दत्तात्रयपंत यांचे निधन झाले. ती सर्व मंडळी मिरजला जातात. विधवाव्रतात दहा वर्षे वेण्णा सासरी असते; पण वाड्यबाहेर न येता ती रामभक्ती करत असते. तिला मारूतीरायाचेही दर्शन होते. काळाप्रमाणे बदलायला हवं यासाठी सासू-सासरे नाना व माई तिला मंदिरात घेऊन येतात. वेण्णाला परमार्थातून ईश्वराची शोध घ्यायचा असतो. वेण्णा रामभक्तीत मग्न असते; मात्र तिची मानलेली वहिनी शर्वरी तिला घरात आलेल्या समर्थ व उद्धवाला भिक्षा देण्यास नाकरते. एके दिवशी समर्थ रामदास स्वामीच वेण्णाला भेटतात. त्यांच्याकडून वेण्णा गुरूभक्तीचा अनुग्रह घेणार असते. इकडे शर्वरी व तिच्या पती तिच्या आई-वडिलांचा वाडा हस्तगत करायचा असतो. वेण्णाची प्रसिद्धी त्यांना पाहावत नाही. एके दिवशी गावकऱ्यांना घेऊन वाड्यावर येतात. वेण्णाची अपकीर्ती गावकऱ्यांसह आई-वडिलांना सांगतात. त्या वेळी तेही तिला साथ देत नाहीत. आध्यात्माकडे वळलेल्या वेण्णाला गावकरी व शर्वरी व तिचा पती विष पिण्यास भाग पाडतात. ती विष प्राशन करते. त्या वेळी गावकरी पळून जातात. त्यानंतर समर्थ रामदास स्वामी तेथे येतात आणि तिला जीवंत करतात व तिला घेऊन जातात. तिला चापळच्या मठाची जबाबदार देतात. त्या वेळी सीतामाई भेटते. वेण्णा पहिली स्त्री मठाधिपती होते. पुढे ते सज्जनगडावर तिला प्रत्यक्षात रामाचे दर्शन होते, अशी कथा या नाटकात अधोरेखित केली आहे. लहानपणीची वेण्णा आकृती केळकर या नाटकात भाव खाऊन गेली. तिच्या अभिनयाला रसिकांनी दाद दिली. तसेच संगीत, अभिनय, विशिष्ठ व्यक्तरेखांची रंगभूषा, परमार्थ, मोक्षाचा मार्ग आणि बालविधवा स्त्रियासाठी समर्थांचे योगदान याचे दर्शन रसिकांना झाले. भक्तीरसात न्हाऊन गेलेल्या या नाटकाचे रसिकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
--
* पात्र परिचय
लहान वेण्णा ः आकृती केळकर, गोपाजीपंत ः डॉ. वैभव लिमये, राधिकाबाई ः जान्हवी गोविलकर, गाडीवान ः प्रभाकर वैशंपायन, नाना देशपांडे ः विनायक बाळ, माई देशपांडे ः सुप्रिया रिसबुड, मोठी वेण्णा ः गौरी खरे, रामदास स्वामी ः अभिषेक जोशी, शर्वरी ः पूजा लागू, सदा ः डॉ. प्रमोद जोशी, उद्धव स्वामी ः जगन्नाथ जोशी, आक्काबाई ः अक्षता जोशी, अंबिकाबाई ः आर्या लिमये, हरिबाबा ः मिलिंद कर्वे, रामाई ः डॉ. सानिका जोशी, सहाय्यक ः राजेंद्र वैशंपायन, आदित्य रिसबुड, वेदांग शितूत, पार्थ पटवर्धन, अमेय आखवे.
--
* सूत्रधार आणि साह्य
लेखक-दिग्दर्शक ः विलास कर्वे, संगीत दिग्दर्शक ः निळकंठ गोखले, ऑर्गन ः आनंद वैशंपायन, तबला ः चैतन्य गोडबोले, मृदंग तालवाद्य ः नागेश किरडावकर, पार्श्वसंगीत, ध्वनीमुद्रण संकलन ः नितीन बागडे, नेपथ्य ः पूर्णानंद मेंहेंदळे, प्रकाशयोजना ः अनंत साळवी, वेशभूषा ः वीणा कर्वे, रंगभूषा ः रामनाथ आवले, रंगमंच व्यवस्था ः प्रसाद फाटक, कला ः आदिती वैशंपायन.
-----
आजचे नाटक
नाटक ः.संगीत डबल लाईफ. सादरकर्ते ः बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई, स्थळ ः स्वातंत्र्यवीर, वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी. वेळ ः सायं. ७ वा.
----

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com