-सभापतिपदी शिवाजीराव शिगवण

-सभापतिपदी शिवाजीराव शिगवण

rat१११८.txt

(पान ६ साठी)

फोटो ओळी
-rat११p२५.jpg ः
८१९८०
दापोली ः नवनिर्वाचित सभापती शिवाजीराव शिगवण यांचे अभिनंदन करताना डावीकडून संचालिका सुनीता बेलोसे, उपसभापती प्रियदर्शन बेलोसे, उजवीकडून संचालक अनंत सणस, कार्यवाह डॉ. दशरथ भोसले व प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड.
----
बेलोसे एज्युकेशन फाउंडेशनच्या
सभापतीपदी शिवाजीराव शिगवण

हर्णै, ता. ११ ः दापोली येथील आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशनची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली. संस्थेच्या सभापतिपदी शिवाजीराव शिगवण, तर उपसभापतिपदी प्रियदर्शन बेलोसे यांची निवड झाली आहे.
कार्यवाह डॉ. दशरथ भोसले यांनी निवडणूक प्रक्रिया सांगून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परिचय करून दिला. या प्रसंगी शिवाजीराव शिगवण यांनी महाविद्यालयाचे गतवैभव व आठवणी सांगितल्या. शिगवण हे कृषी पदवीधर असून ते पंचायत समितीत कृषी अधिकारी म्हणून सेवेत होते. आज या संस्थेतील ४० वर्षाचा सदस्य ते सभापती असा प्रवास त्यांनी पूर्ण केला.
त्यांनी त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. या प्रसंगी वराडकर-बेलोसेचे प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड यांनी महाविद्यालयातर्फे त्यांचे यथोचित स्वागत करून ग्रंथभेट देऊन अभिनंदन केले. आगामी काळात संस्थेच्या विकासात, महाविद्यालयाच्या शैक्षणिक संशोधन व विकासविषयक कामासाठी त्यांचा अनुभव व मार्गदर्शनाचा फायदा होईल, अशी अपेक्षा प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड यांनी व्यक्त केली. या वेळी कार्यवाह डॉ. दशरथ भोसले, सहकार्यवाह अनंत सणस व संचालिका सुनीता बेलोसे, डॉ. भारत कऱ्हाड आदी उपस्थित होते.
...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com