सकाळ सूर्यनमस्कार उपक्रम

सकाळ सूर्यनमस्कार उपक्रम

rat1115.txt

बातमी क्र.. 15 (पान 6 साठीमेन)

फोटो ओळी
-rat11p18.jpg-
81968
रत्नागिरी ः जि. प. कुवारबाव शाळा क्र. 1 येथे सूर्यनमस्कार घालताना बालदोस्त.
-rat11p19.jpg ः
81969
जीजीपीएस शाळेत सूर्यनमस्कार उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.
-rat11p20.jpg ः
81970
जीजीपीएसमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने नमस्कार घातले.
-rat11p21.jpg ः
81971
कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात सूर्यनमस्कार घालताना पहिली ते चौथीचे विद्यार्थी.
----
सामूहिक सूर्यनमस्कार उपक्रमाला प्रतिसाद

सकाळतर्फे आयोजन ; शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी, ता. ११ ः ''सकाळ''तर्फे शनिवारी शहर, परिसरातील विविध शाळांमध्ये सामूहिक सूर्यनमस्कार उपक्रमाचे आयोजन केले. याला चांगला प्रतिसाद लाभला. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्तपणे भाग घेतला. विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कारातील प्रणामासन, हस्त उत्तानासन, अश्व संचालनासन, चतुरंग दंडासन, भुजंगासन, उत्तानास, अधोमुख श्वानासन आदी १२ आसने घातली.
समाजातील सर्व वयोगटासाठी सूर्यनमस्कार हे अत्यंत उपयुक्त आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात नोकरीवर जाणे, उदरनिर्वाह करण्यासाठी पैसे कमावणे, काही काळ आराम करण्याच्या पलीकडे सामान्य लोक काही जादा करत नाहीत. वास्तविक लहानपणापासून सूर्यनमस्कार घालण्याची सवय राहिल्यास वेगवेगळ्या व्याधींपासून दूर राहता येते व आपले स्वास्थ्य चांगले ठेवता येते, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
शहरातील भारत शिक्षणमंडळाच्या कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले. जीजीपीएस शाळेमध्ये क्रीडाशिक्षिका पूनम भरणकर व मुख्याध्यापिका सोनाली पाटणकर यांनी उपक्रम यशस्वी केला. कुवारबाव येथील जिल्हा परिषद शाळा क्र. १ मध्ये मुख्याध्यापिका पुष्पलता सावंत, उपशिक्षिका अर्चना जाधव, संतोषी बिर्जे, रेणुका पवार आणि अरूंधती आंबेरकर यांनी या उपक्रमासाठी मेहनत घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com