पाणथळ जागांमुळेच पर्यावरण संरक्षण

पाणथळ जागांमुळेच पर्यावरण संरक्षण

81998
आचरा : येथील जामडूल परिसरातील पाणथळ जागांना कणकवली कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी भेटी दिल्‍या.

पाणथळ जागांमुळेच पर्यावरण संरक्षण

सुषमा केणी : कणकवली कॉलेज विद्यार्थ्यांचा पाणथळ ठिकाणी अभ्यास दौरा

कणकवली, ता.११ : मानवी खाद्यासह विविध प्राणी पक्ष्यांचं माहेरघर म्‍हणून पाणथळ जागेला महत्‍व आहे. पाणथळ जागा नष्‍ट झाल्‍या तर जमिनीची धूप होऊन नागरी वस्ती धोक्‍यात येतील. तसेच पशुपक्षांच्या अनेक जातीही संकटात येतील. या पाणथळ जागांमुळेच पर्यावरण आणि मानवाच सरंक्षण होत आहे, असे प्रतिपादन युरोका सायन्स क्‍लबच्या अध्यक्षा सुषमा केणी यांनी केले.
येथील कणकवली कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी जागतिक पाणथळ दिनाच्या औचित्यावर पेंडूर, वायंगणी, आचरा (ता.मालवण) येथील पाणथळ जागांना भेटी देऊन अभ्यास केला. कणकवली कॉलेज आणि युरोका सायन्स क्‍लब यांच्यावतीने हा कार्यक्रम झाला. यात पाणथळ जागांबाबतची माहिती सुषमा केणी यांनी दिली.
या नियोजित दौऱ्यात कणकवली कॉलेज भूगोल विभाग, वनस्पती विभागातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षातील ७२ विद्यार्थी उपस्थित होते. त्‍यांना प्रा. डॉ. बाळकृष्ण गावडे, प्रा. डॉ. बी. एल्. राठोड, प्रा. डॉ. तेजस जयकर, सानिका राणे यांनी मार्गदर्शन केले. या दौऱ्यात रुपारेल कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक डॉ. नाडकर्णी, कीर्ती कॉलेजच्या निवृत्त प्राध्यापिका नाडकर्णी, स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघाचे संदीप राणे उपस्थित होते.
प्रा. डॉ. बाळकृष्ण गावडे यांनी ‘रामसार कन्व्हेंशन आणि पाणथळ परिसरातील वनस्पती विविधता’ विषयावर विस्तृतपणे माहिती दिली. उदय दुखंडे यांनी पारंपारिक ‘देव शेती’ व तीचे पर्यावरणातील महत्व सांगितले. प्रा. डॉ. बी. एल. राठोड यांनी ‘कांदळवन व्यवस्थापन आणि संवर्धन’बाबत मार्गदर्शन केले. प्रवीण सावंत भोसले यांनी पाणथळ परिसरातील ‘पक्षी वैभव’ यावर बहुमूल्य माहिती दिली. गुरुनाथ कदम यांनी ‘अॅक्वाटिक बायोडाव्हर्सिटी’वर महत्वपूर्ण माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com