आंबेगावला नळपाणी योजना

आंबेगावला नळपाणी योजना

82009
आंबेगाव ः नळपाणी योजनेचे भूमिपूजन करताना शिवाजी परब, महेश सारंग आदी.

आंबेगावला नळपाणी योजना
सावंतवाडी ः जल जीवन मिशन अंतर्गत आंबेगाव येथे मंजूर झालेल्या नळपाणी योजनेचे भूमिपूजन आज सरपंच शिवाजी परब व जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग यांच्या हस्ते झाले. या योजनेमुळे गावातील प्रत्येक कुटुंबाला लवकरच मुबलक प्रमाणात पाणी मिळणार आहे. तातडीने काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे सारंग यांनी सांगितले. यावेळी नायब तहसीलदार विजय वरक, उपसरपंच रमेश गावडे, पंच सदस्य योगेश गवळी, आनंदी मुळीक, साक्षी राऊळ, दीपक बर्वे, ग्रामसेवक अमित राऊळ, पोलिस पाटील लक्ष्मण गावडे, माजी सरपंच नामदेव परब, माजी सरपंच वर्षा वरक, जमीन मालक जनार्दन लांबर, सुनंदा लांबर, भाजप बूथ अध्यक्ष संतोष राणे, तुकाराम राऊळ, संजू गावडे, अण्णा केळुसकर, लक्ष्मण कडव, रवी गावडे, महादेव गावडे, राजेंद्र केरकर आदी उपस्थित होते.
...............
82013
नीलेश राणे

कुडाळ-मालवणसाठी दीड कोटी
कुडाळ ः ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे २५/१५ अंतर्गत कुडाळ-मालवण मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी १ कोटी ६५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. यासाठी माजी खासदार तथा भाजप प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री महाजन यांनी पहिल्या टप्प्यात १ कोटी ६५ लाखांच्या निधीला मंजुरी दिली आहे. यामध्ये कुडाळ तालुक्यातील विकासकामांसाठी सर्वाधिक १ कोटी ५ लाख, तर मालवण तालुक्यासाठी ६० लाखांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे कुडाळ व मालवण तालुक्यांतील विकासकामांना गती येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com