दुसऱ्या टप्प्यातील गाळ काढण्याचे काम जलसंपदा खात्याकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुसऱ्या टप्प्यातील गाळ काढण्याचे काम जलसंपदा खात्याकडे
दुसऱ्या टप्प्यातील गाळ काढण्याचे काम जलसंपदा खात्याकडे

दुसऱ्या टप्प्यातील गाळ काढण्याचे काम जलसंपदा खात्याकडे

sakal_logo
By

rat११७.txt

(पान २ साठीमेन)

फोटो ओळी
-rat११p७.jpg ः
८१९५१
चिपळूण ः दुसऱ्या टप्प्यात वाशिष्टी नदीत खेर्डी येथे नदीत गाळ करण्याचे काम जलसंपदाकडून सुरू आहे.
---
गाळ उपशाचे काम ‘जलसंपदा’कडे

वाशिष्ठीतील दुसरा टप्पा ; बहादूरशेख नाक्यापासून सुरवात

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ११ ः वाशिष्ठी नदीतून दुसऱ्या टप्प्यातील गाळ करण्याचे काम जलसंपदा खात्याकडे राहणार आहे. पहिल्या टप्प्यातील गाळ काढण्याचे काम नाम फाउंडेशनला मिळाले. त्यामुळे दुसऱ्या टप्प्याची जबाबदारी जलसंपदा खात्याकडे असेल हे स्पष्ट झाले आहे. जलसंपदा खाते यांत्रिकी विभागाच्या मदतीने दुसऱ्या टप्प्यातील गाळ काढणार आहे.
वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे काम तीन टप्प्यात विभागण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात बहादूरशेख नाका ते गोवळकोटपर्यंतचा भाग घेण्यात आला. या टप्प्यातील गाळ जलसंपदा खाते आणि नाम फाउंडेशन या संस्थेने संयुक्तरित्या काढले. गाळ काढण्यासाठी शासनाने एकूण दहा कोटींचा निधी मंजूर केला आहे. यातील ५० टक्के रक्कम पहिल्या टप्प्यातील गाळ करण्यासाठी खर्च करण्यात आली आहे. जलसंपदा आणि नाम फाउंडेशन या संस्थेने लोकसभागातून गाळ काढण्याचे काम केले. आता पहिल्या टप्प्यात २.८ दशलक्ष घनमीटर इतका गाळ शिल्लक आहे. या गाळामध्ये वाळूचे प्रमाण जास्त आहे. प्रामुख्याने हा गाळ गोवळकोट भागामध्ये अधिक आहे. त्यामुळे या भागातील वाळू व्यावसायिकांनी मोफत गाळ काढण्याची तयारी दर्शवली होती. निघणाऱ्या गाळापैकी वाळूची रॉयल्टी भरण्यास वाळू व्यावसायिक तयार होते; मात्र वाळू व्यावसायिकांमध्ये दोन गट आहेत. एका गटाचे राजकीय वजन जास्त असल्यामुळे या गटाने गाळ करण्याचे काम नाम फाउंडेशनला मिळवून देण्यासाठी आपले वजन वापरले. शासकीय खात्याला डावलून स्वयंसेवी संस्थेला गाळ काढण्याचे काम देण्यात आले. पहिल्या टप्प्यातील उर्वरित गाळ काढण्याचे काम नाम फाउंडेशनला मिळाल्यानंतर जलसंपदा खाते काय करणार, असा प्रश्न होता; मात्र बहादूरशेख नाका ते पोफळी या दुसऱ्या टप्प्यातील गाळ काढण्याचे काम जलसंपदा खात्याकडे राहणार आहे. जलसंपदा खात्याने सती पिंपळी, खेर्डी, बहादूरशेख नाका, खडपोली, अलोरे, शिरगाव, पेढांबे या भागातील गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम जलसंपदा खात्याला पूर्ण करावे लागणार आहे.
---

दुसरा टप्पा
*बहादूरशेख नाका ते पोफळी
*काढावी लागणारी बेटे - १४
*एकूण गाळ - ५. ८० लक्ष घनमीटर
--
कोट
गाळ काढण्यासाठी शासनाची पुरेशी यंत्रणा उपलब्ध आहे. दुसऱ्या टप्प्यातील गाळ काढण्याचे योग्य नियोजन झाले आहे. काढलेल्या गावाची शासनाच्या सूचनेनुसार विल्हेवाट लावली जात आहे.
- उपअभियंता, जलसंपदा विभाग, चिपळूण
...