वारीशे मृत्यू प्रकरण वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न

वारीशे मृत्यू प्रकरण वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न

rat१११९.TXT

(पान ५ साठी)

वारीशे मृत्यू प्रकरण वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न

नीलेश राणेंचे ट्विट ; खासदार विनायक राऊतांवर पलटवार

रत्नागिरी, ता. ११ ः पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मृत्यूप्रकरणातील संशयिताला उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी गेल्या वर्षभरात कितीवेळा भेटले याचा खुलासा खासदार संजय राऊत आणि खासदार विनायक राऊत यांनी आधी करावा मगच राणेंवर बोलावे. वारीशे मृत्यू प्रकरण वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा आरोपाचे भाजपा नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी ट्विट केले आहे.
या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये राणे म्हणाले, पत्रकार शशिकांत वारीशे यांचे निधन ज्या गाडीखाली झाले असा आरोप आहे तो गाडीचा मालक आता पोलिस कोठडीत आहे. त्याच्यावर ३०२ नुसार गुन्हा दाखल आहे. पोलिस आपले काम करत आहेत. या संदर्भात खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर आरोप करण्यापूर्वी तुमच्याच पक्षाचे आमदार साळवींना वारीशे प्रकरणातील संशयित कितीवेळा भेटला त्याचा खुलासा करावा. तो संशयित एक ते दीड महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात रिफायनरीसंदर्भात झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्याबरोबर तिथे उपस्थित होता का नाही, याची माहिती घ्यावी. रिफायनरीच्या किती बैठकांमध्ये संबंधित व्यक्ती आणि राजन साळवी एकमेकांना भेटले आणि मागच्या वर्षभरात त्यांची कितीवेळा भेट झाली? याचा खुलासा करावा.
ते म्हणाले, विनायक राऊतांची खासदारकीची सगळी कामं संपली आहेत, म्हणून उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी राणेंवर वाट्टेल ते बोलत आहेत. वारीशे अपघातातील सगळ्या गोष्टी पोलिस तपासात पुढे येणारच आहेत. तुमच्या कारकिर्दीत असं काहीतरी करा की, त्याच्यामुळे लोकं तुम्हाला ओळखतील. आरोप करणे हे तुमचं नेहमीचंच आहे. कोकणची लोकं तुम्हाला आता रड्या म्हणून ओळखायला लागली आहेत. तेव्हा असं बिनबुडाचे आरोप करणं सोडा आणि काहीतरी चांगलं काम करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com