दाभोळ-बैलाच्या हल्ल्यात मालकाचा मृत्यू

दाभोळ-बैलाच्या हल्ल्यात मालकाचा मृत्यू

rat११p३९.jpg
८२०६९
विठोबा घोले
----------
बैलाच्या हल्ल्यात मालकाचा मृत्यू
पिसईतील घटना ; घोलेंच्या बैलाची गावात दहशत
दाभोळ, ता. ११ ः दापोली तालुक्यातील पिसई वजरवाडी येथे विठोबा सखाराम घोले (वय ६५) यांच्यावर त्यांच्याच बैलाने केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना ९ फेब्रुवारीला सायंकाळी पाचच्या दरम्यान घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार विठोबा घोले हे ९ फेब्रुवारीला दापोलीत आले होते. दापोलीतून पिसईला गेल्यावर त्यांचा बैल पऱ्याकडे (ठिकाणाचे नाव) असल्याचा त्यांना फोन आल्याने ते घरी न जाता बैलाला कोंडवाड्यात कोंडण्यासाठी गेले; मात्र ते परतलेच नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा रात्री शोध घेतला; मात्र ते सापडले नाहीत. सकाळी त्यांचा मृतदेह कासारवाडीचा पऱ्या येथे आढळून आला. त्यांच्या डोक्याला, मानेला व छातीवर जखमा असल्याने बैलाने त्यांच्यावर हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पिसई वजरवाडीत घोले यांच्या बैलाची मोठी दहशत असून बैल दिसल्यास नागरिक भीतीने पळून जात असत. गावात कोणीही त्या बैलाजवळ जात नाही. तसेच घरच्या कुटुंबातील व्यक्तीलासुद्धा यापूर्वी त्या बैलाने मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या बैलाला विकून टाकण्याचा सल्ला अनेकजण देत होते; मात्र बैल चांगला आहे म्हणून त्यांनी या बैलाला घरीच ठेवले होते. घोले यांनाच हा बैल घाबरत होता. इतर कोणालाही तो जवळ येऊ द्यायचा नाही; परंतु बैलाच्या हल्ल्यात मालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com