रत्नागिरी-सीसीटीव्ही फुटेज न्यायालयाला सादर

रत्नागिरी-सीसीटीव्ही फुटेज न्यायालयाला सादर

स्वप्नाली सावंत मृत्यूप्रकरणातील
सीसीटीव्ही फुटेज न्यायालयाला सादर
रत्नागिरी, ता. ११ : स्वप्नाली सावंत मृत्यू प्रकरणी मुख्य संशयित आरोपी सुकांत उर्फ भाई सावंत यांनी मागितलेले सीसी टीव्ही फुटज शहर पोलिसांनी न्यायालयाला सादर केले. याला संबंधित अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. त्यामुळे त्या फुटेजमध्ये काय आहे आणि या केसवर त्याचा काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्वप्नाली सावंत मृत्यू प्रकरणी मुख्य संशयित आरोपी सुकांत उर्फ भाई सावंत यांनी सीसी टीव्ही फुटेज मिळण्यासाठीचा अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाकडे केला होता. ती मागणी अंशतः मंजूर केली आहे. १० सप्टेंबर २०२२ ला सायंकाळी ६ वाजता उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी), शहर पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेतील सीसी टीव्ही फुटेज तपासून पहा, त्यात काही आढळल्यास संशयिताच्या मागणीनुसार न्यायदंडाधिकारी पुढील योग्य आदेश देऊ शकतात. ते फुटेज राखून ठेवावे, असे आदेशात म्हटले आहे.
स्वप्नाली सावंत या बेपत्ता झाल्याची तक्रार पती भाई सावंत यांनी केली होती. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी भाई सावंत यांनी चौकशीसाठी ८ सप्टेंबरला ताब्यात घेतले होते. चौकशी सुरू असतानाच स्वप्नाली सावंत हिची आई संगीता कृष्णा शिर्के यांनी ११ सप्टेंबरला तक्रार दिली. भाई सावंतने १० सप्टेंबरला मला मिऱ्यावर सांगितले की, मी पत्नीचा (स्वप्नाली) खून करून तिचे तुकडे केले आणि ते जाळून राख समुद्रात फेकून दिली. जर ८ सप्टेंबरपासून भाई सावंत चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात आहेत, तर १० सप्टेंबरला ते सासूला हे सर्व सांगायला मिऱ्यावर कधी गेले, असा सवाल भाई सावंत यांचे वकील फैसल डिंगणकर, मुद्दसर डिंगणकर आणि सचिन नाचनकर यांनी उपस्थित केला आहे. या अनुषंगाने संशयित आरोपी भाई सावंत यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज करून डीवायएसपी कार्यालय, शहर पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे १० सप्टेंबर २०२२ चे सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यानचे सीसी टीव्ही फुटेज मिळण्याबाबत केलेला रिव्हिजन अर्ज न्यायालयाने अंशतः मान्य केला आहे. शहर पोलिसांनी १० सप्टेंबर २०२२ च्या सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यानचे सीसी टीव्ही फुटेज देण्यात आल्याचे शहर पोलिस सुत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com