मोबाईल लोकेशनवरून बॅग चोरणारा गजाआड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोबाईल लोकेशनवरून
बॅग चोरणारा गजाआड
मोबाईल लोकेशनवरून बॅग चोरणारा गजाआड

मोबाईल लोकेशनवरून बॅग चोरणारा गजाआड

sakal_logo
By

मोबाईल लोकेशनवरून
बॅग चोरणारा गजाआड

कुडाळमधील घटना; काही तासांत तपास

कुडाळ, ता. ११ ः येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये द्वितीय वर्ष विज्ञान आयटी शाखेत शिक्षण घेणाऱ्या इविशा डिसोजा या विद्यार्थिनीची चोरीला गेलेली बॅग पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून अवघ्या काही तासांत परत मिळवून दिली. बॅग चोरी करणारा युवक कारीवडे-पेडवेवाडी येथील रहिवासी असून पोलिसांनी त्याला समज देऊन सोडून दिले.
येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या दाभोली येथील इविशा डिसोजा या विद्यार्थिनीची बॅग महाविद्यालयांतून चोरीस गेली होती. यामध्ये रोख रक्कम व मोबाईल होता. चोरी करणारी व्यक्ती महाविद्यालयातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. हा युवक या ठिकाणचा नसल्याचे दिसून आले होते. याबाबत येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीनंतर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार मंगेश जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासाला सुरुवात केली. चोरीला गेलेला मोबाईल सुरू असल्यामुळे मोबाईल लोकेशनवरून शोध काढणे सोपे झाले. ही बॅग चोरून संबंधित चोरटा मालवण-कट्टा येथे गेल्याचे निदर्शनास आले. त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे बॅगेसह मोबाईल आणि इतर वस्तूही आढळून आल्या; मात्र त्यातील रक्कम त्याने खर्च केल्याचे सांगितले. गुन्हा दाखल झाल्यापासून काही तासांतच चोरट्यासह मुद्देमाल परत मिळविल्याबाबत कुडाळ पोलिसांचे कौतुक होत आहे.