कुडाळ पेन्शनर्स असोसिएशन अध्यक्षपदी चंद्रकांत अणावकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळ पेन्शनर्स असोसिएशन
अध्यक्षपदी चंद्रकांत अणावकर
कुडाळ पेन्शनर्स असोसिएशन अध्यक्षपदी चंद्रकांत अणावकर

कुडाळ पेन्शनर्स असोसिएशन अध्यक्षपदी चंद्रकांत अणावकर

sakal_logo
By

82373
चंद्रकांत अणावकर

कुडाळ पेन्शनर्स असोसिएशन
अध्यक्षपदी चंद्रकांत अणावकर
कुडाळ, ता. १२ ः कुडाळ पेन्शनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी चंद्रकांत अणावकर, तर सरचिटणीसपदी मनोहर सरमळकर यांची निवड करण्यात आली. कुडाळ तालुका पेन्शनर्स असोसिएशनची वार्षिक सभा सावंतवाडी संस्थान मराठा समाज सभागृहात अशोक रासम यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
मागील कार्यकारिणीची मुदत संपल्याने पुढील तीन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली. यामध्ये उपाध्यक्ष घनःश्याम शिरसेकर, कोषाध्यक्ष महावीर आरोलकर, सल्लागार अशोक रासम यांची निवड करण्यात आली. नवीन पेन्शन योजना २००५ पासून सुरू झाल्यानंतर आजपर्यंत या योजनेत समाविष्ट असलेल्यांपैकी जे कर्मचारी गंभीर आजार किंवा अपघात होऊन मरण पावले, त्यांच्या कुटुंबीयांना शासन हिस्सा सोडाच; पण कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहा कपात करून घेतलेल्या रक्कमेपैकी एक रुपया सुध्दा मिळालेला नाही, याबद्दल शासनाविरोधातसंतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या. शासनाने मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर होणारा अन्याय दूर करावा, असा ठराव करण्यात आला. कर्मचारी सेवानिवृत्त होताना त्याला पेन्शनच्या अंशराशिकरणाची (पेन्शन विक्री) जी रक्कम मिळते, ती १८० मासिक हप्त्यात दरमहा पेन्शनमधून भरून घेतली जाते; परंतु मिळालेल्या रकमेपेक्षा वसूल केलेली रक्कम दीड ते पावणे दोनपट असते. या संदर्भात गुजरात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्माणयानुसार गुजरात राज्याने परतफेडीची मुदत १५ वर्षांऐवजी १२ वर्षे केली आहे. तसा महाराष्ट्राने निर्णय घेऊन पेन्शनर्स कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, असाही ठराव केला. सभेत ज्येष्ठ सदस्य मनोहर आंबेकर, सी. टी. कोचरेकर, शरद कांबळी, आर. आर. दळवी, उदय कुडाळकर, विजय साऊळ, मीनाक्षी नार्वेकर, दत्तात्रेय शिरसाट यांनी पेन्शनर्सच्या प्रश्नांवर मार्गदर्शन केले.