नेरुर कलेश्वर मंदिरात महाशिवरात्रोत्सव

नेरुर कलेश्वर मंदिरात महाशिवरात्रोत्सव

82250
नेरुर ः येथील कलेश्वर मंदिरात तहसीलदार पाठक यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक झाली.

नेरुर कलेश्वर मंदिरात महाशिवरात्रोत्सव

बैठकीत नियोजन; शनिवारी विविध कार्यक्रम

कुडाळ, ता. १२ ः नेरुर येथील श्री देव कलेश्वर मंदिरात कोरोना काळामुळे मागील दोन वर्षे महाशिवरात्री उत्सव मोठ्या स्वरुपात साजरा झाला नाही. यावर्षी शनिवारी (ता. १८) हा उत्सव भव्य स्वरुपात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यामिक कार्यक्रमांनी साजरा करण्याचे ग्रामस्थांच्या बैठकीत ठरविण्यात आले.
हा बैठक काल (ता. ११) सकाळी अकराला नेरूर कलेश्वर मंदिराच्या सभागृहात झाली. यावेळी कुडाळ तहसीलदार अमोल पाठक, पोलिस अधिकारी नदाफ, देवस्थान स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष प्रदीप नाईक, नेरुर गावच्या प्रथम नागरिक सरपंच भक्ती घाडी, उपसरपंच म्हाडदळकर, माजी सरपंच चारुदत्त देसाई, देवस्थान स्थानिक सल्लागार समितीचे सर्व सदस्य आणि नेरुर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. महाशिवरात्री दिवशी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. आरोग्य यंत्रणेचे १७ कर्मचारी दिवस-रात्र या उत्सवादिवशी आपली सेवा देणार आहेत. यावेळी वीज पुरवठ्याबाबत सुध्दा चर्चा करण्यात आली. एसटी महामंडळाच्या वतीने कुडाळ-नेरुर-वालावल-कवठी, कुडाळ-नेरुर आणि नेरुर- गणेशवाडी मार्गे माड्याचीवाडी अशा विशेष फेऱ्या उत्सवादिवशी सकाळी ते रविवारी म्हणजे शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत रात्रंदिवस एसटीच्या विशेष फेऱ्या चालू राहणार आहेत, अशी माहिती एसटी विभागाकडून देण्यात आली. यावेळी आरोग्य, महावितरण, एसटी महामंडळ आणि पोलिस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. यावर्षी १८ रोजी होणाऱ्या महाशिवरात्र उत्सवासाठी पोलिस यंत्रणा सज्ज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com