
‘प्लास्टिक पीक अप डे’ला माजगावात उत्स्फूर्त प्रतिसाद
82251
माजगाव ः ‘प्लास्टिक पीक अप डे’ उपक्रमात सहभागी सरपंच अर्चना सावंत, अजय सावंत आदी.
‘प्लास्टिक पीक अप डे’ला
माजगावात उत्स्फूर्त प्रतिसाद
सावंतवाडी, ता. १२ ः माजगाव ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणच्या परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करण्यासाठी माजगाव ग्रामपंचायत सरपंच अर्चना सावंत यांच्या संकल्पनेतून काल (ता. ११) गावातील प्लास्टिक गोळा करून ‘प्लास्टिक पीक अप डे’ उपक्रम साजरा केला.
या उपक्रमासाठी सकाळी दहाला माजगाव येथील भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी एकत्र आले होते. माजगावातील सर्व वाडी, रस्ते, मंदिरांजवळील परिसर, सातजांभळ, मळगाव घाटी शा सर्व भागातील प्लास्टिक एकत्र करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी सरपंच सावंत, उपसरपंच संतोष वेजरे, सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी संदीप गोसावी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व सदस्या रेश्मा सावंत, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, आरोग्य अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी, हायस्कूलमधील मुले, ग्रामस्थ या उपक्रमांत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी प्लास्टिकचा वापर टाळणे ही काळाची गरज आहे, अशी माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी मुलांना पर्यावरणपूरक पिशव्या व रोपांचे वाटप करण्यात आले. उपक्रमास ग्रामस्थांनी प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.