महाराष्ट्राची संस्कृती ‘मराठी’ जपुया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्राची संस्कृती ‘मराठी’ जपुया
महाराष्ट्राची संस्कृती ‘मराठी’ जपुया

महाराष्ट्राची संस्कृती ‘मराठी’ जपुया

sakal_logo
By

-rat१२p१७.jpg-
82253
राजापूर ः ग्रामीण मराठी साहित्य संमेलनामध्ये विचार मांडताना संमेलनाध्यक्ष प्रकाश देशपांडे.
-rat१२p१८.jpg
82254
राजापूर ः संमेलनाध्यक्ष प्रकाश देशपांडे यांचा सत्कार करताना राजापूर-लांजा तालुका नागरीक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड.
---------

महाराष्ट्राची संस्कृती ‘मराठी’ जपुया

प्रकाश देशपांडे; गुरूवर्य स्व. महादेव कुंडेकर साहित्यनगरीतील संमेलन

(राजापूर), ता. १२ ः जागतिकीकरण, प्रसारमाध्यमांचा अतिरेक, इंग्रजीचे वाढते प्रस्थ आदींमुळे आपण आपल्या प्राचीन संस्कृतीपासून, आपल्या मातृभाषेपासून दूर होत चाललो आहोत. जोपर्यंत घरोघरी एखादा तरी तुकोबांचा अभंय गायला जातोय, कुठेतरी हरिपाठाचा गजर होतोय तोपर्यंत मराठीला मरण नाही. या महाराष्ट्र भूमीची संस्कृती सांगणारी मराठी भाषा जपण्याचा साऱ्यांनी निर्धार करू या, असे आवाहन आठव्या ग्रामीण मराठी साहित्य संमलेनाचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी केले.
तालुक्यातील तळवडे येथील गुरूवर्य स्व. महादेव कुंडेकर साहित्यनगरीमध्ये आठवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे श्री. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अध्यक्षीय भाषण करताना श्री. देशपांडे यांनी विविध विषयांवर भाष्य करताना साऱ्यांचे लक्ष वेधले.
श्री. देशपांडे म्हणाले, पूर्वी गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्रातून गोव्यात गेलेल्या मराठी शिक्षकांनी मोलाचे सहभाग घेतला होता. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक मोहन रानडे हे त्यापैकीच एक होते. गोव्यात मराठी शाळा गावोगावी होत्या. आज मात्र हाताच्या बोटावर मोजायलाही मराठी शाळा शिल्लक नाहीत. तोच प्रकार बृहन्महाराष्ट्रात आहे. मुंबईतल्या मराठी शाळा बंद पडल्या. माझा बावा कसा फाड फाड विंग्रजी बोलताय, हे सांगताना खेड्यापाड्यातील माता गावोगावी दिसत आहे. अशा वळी क्षणभर मनात येते मराठीचे अस्तित्व धोक्यात येते आहे की काय? गेल्या काही वर्षामध्ये महाविद्यालयीन विश्‍वात मराठीही काहीशी दुर्लक्षित होत चालली आहे. वाणिज्य किंवा विज्ञान शाखेत प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या आणि कला शाखेत मराठी विषय घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या यात किती कमी आहे पाहिले तर वास्तवाचे भान येईल. मराठी विषय घेवून पदवी मिळाली, तर उपजिवीकेसाठी नोकरी नाही ही बाब चिंताजनक आहे. प्रादेशिक बोलींच्याच बळावर प्रमाण बोली समृद्ध झाली आहे. प्रादेशिक भाषेच्या ओहळातून आलेल्या जलौघातूनच प्रमाणभाषेचा महासागर निर्माण झालाय. त्यामुळे यापुढे आपली लोकभाषा बोलताना कमीपणा वाटू देवू नका असा मौलिक सल्लाही देशपांडे यांनी दिला.
-----------
अनेक व्यक्तींच्या कार्याचा गौरव
राजापूर-लांजा तालुक्यांनी साहित्य आणि कला क्षेत्राला अफाट देणगी दिल्याचे सांगताना प्रकाश देशपांडे यांनी इथल्या चिमटीत मावेल अशा लहानशा गावांनी साहित्य विश्‍वाला दिग्गजांची देणगी दिल्याचे स्पष्ट केले. त्यांनी साहित्य, कला, सामाजिक आदी विविध क्षेत्रामध्ये योगदान दिलेल्या कोकणासह राजापूर-लांजा तालुक्यातील विविध व्यक्तींचा नामोल्लेख करीत त्यांच्या कार्याचा गौरवही केला.