
राजापूर-साहित्यनगरीत रंगली काव्यमैफल
)
फोटो ओळी
-rat१२p१९.jpg- ३L८२२५५
राजापूर ः कविसंमेनामध्ये कवितांचे सादरीकरण करताना कवी.
------------
साहित्यनगरीत रंगली काव्यमैफल
प्रेम, जीवनातील धावपळीवर भाष्य ; अनेक कवींचा सहभाग
गुरूवर्य स्व. महादेव कुंडेकर साहित्यनगरी (राजापूर), ता. १२ ः तळवडे येथील आठव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनातील कवी संमेलनामध्ये मोठ्यासंख्येने सहभागी झालेल्या कवींनी विविधांगी विषयांवरील कवितांचे सादरीकण केले. दीड तासाहून अधिक काळ कवितांची मैफील रंगली. मानवी स्वभाव, प्रेम वैशिष्ट्ये, घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे चालणारे जीवन अन् त्यातील धावपळ यांसह सामाजिक विविधांगी विषयांवर कवींनी कविता सादर केल्या.
तालुक्यातील तळवडे येथे आठवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या शुभारंभानंतर शेवटच्या सत्रामंध्ये गुरूवर्य स्व. महादेव कुंडेकर साहित्यनगरीत काव्यसंमेलन रंगले. नागेश साळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या काव्य संमेलनामध्ये विजय हटकर, विराज चव्हाण, रामचंद्र तुळसणकर, स्नेहल तुळसणकर, समीर देशपांडे, रामचंद्र खाडे, आशा तेलंगे, प्रिया मांडवकर, लता पाटील, आकांक्षा भुर्के, जनार्दन मोहिते, चंद्रसेन जाधव, नितीश खानविलकर, सुहास आयरे, श्रद्धा कळंबटे आदींनी कविता सादर केल्या. त्यामध्ये ‘शेवटी कविता करायची राहून जाते’, ‘आई‘, ‘आई-वडील’,‘तारूण्यातील पाऊस गाणी’, ‘कन्या रत्न’ आदी कवितांसह देशप्रेम आणि सामाजिक विषयांवरील कवितांचा समावेश होता. ज्या गावामध्ये साहित्य संमेलन होत आहे त्या तळवडे गावचा महिमाही कवींनी काव्यातून सार्यांसमोर उलगडा.
-----------
चौकट ः
अर्जूना नदीचा प्रवास कवितेतून उलगडला
सह्याद्रीच्या पर्वतरांगातून उगम पावून नागमोड्या वळणांचा प्रवास करीत खळाळत वाहत पश्चिम भागातील समुद्राला जावून पोहचणार्या अर्जुना नदीच्या काठावर राजापूर तालुक्यातील अनेक गावे वसलेली आहेत. अर्जुनेच्या सहवासामध्ये अनेक पिढ्यांनी आपली सुखदुःखे अनुभवलेली आहेत. त्याचवेळी अनेकांनी अर्जुनेच्या सहकार्याने अन् साक्षीने आयुष्याच्या प्रगती अन् विकासाची कवाडे खुली केली आहेत. अर्जुना नदीनेही सढळहस्ते राजापूरकरांच्या आयुष्याला विविधांगी नव्या दिशा दिल्या आहेत. अर्जुना नदीचा हा प्रवास आणि राजापूरकरांच्या जीवनातील तिच्या स्थानाचे महत्व समीर देशपांडे यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून विषद केले. त्याचवेळी ‘गाळ काढून तुला वाचवू, शाबूत ठेवू आमची भाकर’ अशा शब्दामध्ये शहरामध्ये लोकसहभागातून राबविल्या जात असलेल्या गाळ उपशाच्या उपक्रमाकडेही सार्यांचे लक्ष वेधले.