लोकअदालतीत साडेपाच कोटी वसूल

लोकअदालतीत साडेपाच कोटी वसूल

82256
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा न्यायालयातील पॅनेल्सद्वारे प्रकरणांचा निपटारा काढताना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका. सोबत अन्य.

लोकअदालतीत साडेपाच कोटी वसूल

जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; २ हजार ३७४ प्रकरणे निकाली

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १२ ः यावर्षातील पहिली राष्ट्रीय लोकअदालत काल (ता. ११) जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये आयोजित करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष एस. जे. भारुका यांच्या नियंत्रणाखाली राष्ट्रीय लोकअदालत झाली. एकूण ९ पॅनेलद्वारे ही अदालत चालविण्यात आली. यासाठी न्यायालयीन प्रलंबित व वादपूर्व अशी एकूण १३ हजार ५४१ प्रकरणे ठेवण्यात आली होती. यातील २ हजार ३७४ प्रकरणे निकाली निघाली. यामुळे ५ कोटी ६४ लाख ९७ हजार ६९९ रुपये एवढी रक्कम वसूल झाली.
जिल्हा न्यायालय येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष भारुका यांनी पॅनेल क्रमांक १ चे पॅनेलप्रमुख म्हणून काम पाहिले. यामध्ये एकूण ४२३ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. एकूण १७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामुळे ८६ लाख ३० हजार ८१६ एवढी रक्कम तडजोडीने वसूल झाली. तसेच जिल्हा न्यायालय सिंधुदुर्ग अंतर्गत येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सिंधुदुर्ग यांच्या न्यायदान कक्षात पॅनेल क्रमांक २ येथे मुख्य न्याय दंडाधिकारी ए. एम. फडतरे यांनी पॅनेलप्रमुख म्हणून काम पाहिले. यामध्ये एकूण २५९ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. एकूण १८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये एकूण २ कोटी ५० लाख १७ हजार ३४५ रुपये एवढी तडजोड रक्कम वसूल करण्यात आली. याच पॅनेलमध्ये वादपूर्व प्रकरणे ८२४ ठेवण्यात आली होती. त्यापैकी एकूण ३० प्रकरणे निकाली काढण्यात आली. १२ लाख ५१ हजार ७६२ रुपये एवढी तडजोड रक्कम वसूल करण्यात आली. या पॅनेलमध्ये एकूण १०८३ प्रलंबित व वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी ४८ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून २ कोटी ६२ लाख ६९ हजार १०७ रुपये एवढी तडजोड रक्कम वसूल करण्यात आली.
सर्व तालुका न्यायालयांची व जिल्हा न्यायालयाची एकूण ९ पॅनेल्स बनविण्यात आली होती. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येकी एक अशा पध्दतीने पॅनेल्स बनवण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यात एकूण ३३२८ एवढी प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी २८९ प्रलंबित प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. या प्रकरणांमध्ये एकूण ४ कोटी १० लाख ५३ हजार ७११ रुपये एवढी रक्कम तडजोड झाली. तसेच एकूण वादपूर्व प्रकरणे १० हजार २१३ एवढी ठेवण्यात आली होती. त्यापैकी एकूण २ हजार ८५ एवढी प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. यामध्ये एकूण रक्कम १ कोटी ५४ लाख ४३ हजार ९८८ रुपये एवढ्या रकमेची तडजोड झाली.
---
सर्वांचाच उत्स्फूर्त प्रतिसाद
या लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्गचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश भारुका, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्गचे सचिव तथा न्यायाधीश डी. बी. म्हालटकर यांनी विशेष परिश्रम घेतले. जिल्हा पत्रकार संघाच्या सर्व पत्रकारांनी प्रसिद्धीस सहकार्य केल्याने त्यांचे विशेष आभार मानले. जिल्हा व तालुका न्यायालयातील सर्व न्यायाधीश, जिल्हा बार असोसिएशन सिंधुदुर्ग व तालुका बार असोसिएशनचे सर्व विधीज्ञ आदींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com