चिपळूण-व्हॅलेंटाईन डे साठी चिपळूण सज्ज

चिपळूण-व्हॅलेंटाईन डे साठी चिपळूण सज्ज

व्हॅलेंटाईन क्लिपार्ट वापरावे..


व्हॅलेंटाईन डे साठी चिपळूण सज्ज
भेटवस्तू, शुभेच्छा पत्रे खरेदी करण्यास सुरवात

चिपळूण, ता. १२ ः ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून तरुणाईची जय्यत तयारी सुरू आहे. कुठे, कधी आणि कोणते गिफ्ट द्यायचे याचे आराखडे बांधले जात आहेत. अनेकांनी भेटवस्तू, शुभेच्छा पत्रे खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या सोयीसाठी बाजारातील अनेक दुकाने लाल-गुलाबी रंगांच्या वस्तूंनी सजली आहेत.
स्नेह, जिव्हाळा, आपुलकी, आस्था, आवड, वात्सल्य, भक्ती, आदर, ममत्व असे प्रेमाचे अनेक रंग आहेत. प्रेमीयुगुलांचा अतिशय आवडीचा रंग असल्याने व्हॅलेंटाईन डे त्यांच्यासाठी खास असतो. हा दिवस महाविद्यालयातही मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. यंदा कोरोनाचे सावट नसल्याने शाळा, महाविद्यालयांमध्ये हा ‘डे’ उत्साहात साजरा केला जाईल. अनेक तरुण-तरुणी समाज माध्यमांचा वापर करून आपले प्रेम व्यक्त करतील. अर्थातच हा दिवस साजरा करण्यासाठी प्रत्येक प्रेमीयुगुलाची आपापली एक वेगवेगळी स्टाईल असते. त्यात व्हॅलेन्टाइन डेचा मुहूर्त साधून कोणाला ‘प्रेमाची कबुली’ द्यायची असते, तर कोणाला ‘ब्रेक अप’ झाल्यामुळे वेगळ्या अर्थाचे शुभेच्छापत्र द्यायचे असते. अशा प्रत्येक निरनिराळ्या मजकुरांची शुभेच्छा पत्रे बाजारपेठेत आहेत.
---------
कोट
आकर्षक हँडबँड‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त सध्या विविध दुकाने ‘फ्रेंडशिप बँड’, ‘टेडी बियर’सह निरनिराळ्या भेटवस्तूंनी सजली आहेत. भेटवस्तूंच्या बहुसंख्य दुकानांत अगदी पाच ते दहा रुपयांपासून १०० रुपयांपर्यंतचे विविध धातूंचे, रेशमाचे आकर्षक ‘फ्रेंडशिप बँड’ने दुकाने सजली आहेत. शुभेच्छा पत्रांनाही अधिक मागणी आहे. भेटवस्तूपेक्षाही शुभेच्छापत्रातील शब्दांच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचणाऱ्या भावना अधिक महत्त्वाच्या आहेत.
-सुधाकर शिंदे, महाविद्यालयीन तरुण
--------
कोट
ऑनलाईन शॉपिंगचा पर्याय ऑनलाईन शॉपिंगमुळे भेटवस्तूंसाठीचे विविध पर्याय उपलब्ध करून दिले जात आहेत. त्यामुळे बाजारात जाऊन विविध भेटवस्तू खरेदी करण्याचा वेळ तर वाचत आहे, शिवाय विविध ऑफर्समुळे ऑनलाईन शॉपिंगला तरुणवर्गाची अधिक पसंती मिळत आहे. तर या संधीचा फायदा घेत भेटवस्तूंच्या किमतीमध्ये ५० ते ६० टक्केपर्यंत सूट देण्यात आली आहे.
-प्रणय कदम, मालक, गिफ्ट शॉपी, चिपळूण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com