शुटींग बॉल स्पर्धेत माणगाव, पडेल संघ विजेता

शुटींग बॉल स्पर्धेत माणगाव, पडेल संघ विजेता

८२२९७


शूटिंग बॉल स्पर्धेत माणगाव, पडेल संघ विजेता
जामसंडेतील स्पर्धा ः क्रीडा महोत्सवाचा उत्साहात समारोप
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १२ ः जामसंडे येथील सन्मित्र मंडळाच्यावतीने आयोजित जिल्हास्तर शुटींग बॉल स्पर्धेत माणगाव संघ तर तालुकास्तरीय स्पर्धेत पडेल हॉलीबॉल संघ विजेता ठरला. मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षिस वितरण झाले. माजी आमदार (कै.) अप्पासाहेब गोगटे स्मृती चषक क्रीडा महोत्सवाचा समारोप झाला.
मंडळाच्यावतीने ६ ते ११ या कालावधीत माजी आमदार अप्पासाहेब गोगटे स्मृती चषक क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले होते. यामध्ये ६ ते ८ या कालावधीत राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा व कुस्ती स्पर्धा पार पडल्या. त्यानंतर मंडळाच्या जिल्हास्तर व तालुकास्तर शूटिंग बॉल स्पर्धेचे (दिवस-रात्र) आयोजन केले होते. यामध्ये तालुकास्तर १२ तर जिल्हास्तर १६ संघानी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्‍घाटन माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे, जिल्हा व तालुका शुटींग बॉल असोसिशनचे अध्यक्ष संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी तालुका असोसिएशनचे राजू भावे, विलास रूमड़े, संतोष ढोके, शरद लाड, जिल्हा पदाधिकारी श्री. गवस, मंडळाचे अध्यक्ष राजा भुजबळ, कार्यवाह चंदू पाटकर आदी उपस्थित होते. या स्पर्धेत जिल्हास्तरावर माणगांव संघ विजेता तर मातोंड संघ उपविजता ठरला. नारिंग्रे संघ तृतीय तर आजगांव संघ चतुर्थ आला. उत्तेजनार्थ बक्षीस - तळेरे संघ, वेताळबांबर्डे संघ, दिर्बारामेश्वर जामसंडे व नांदगांव संघ यांना दिले. तालुकास्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेत पडेल व्हॉलिबॉल संघ विजेता तर नारिंग्रे संघ उपविजेता ठरला. उत्तेजनार्थ दिर्बारामेश्वर अ संघ व वाडा व्हॉलीबॉल संघ यांना दिले. स्पर्धा यशस्वी करणेसाठी संजय कदम, राजु भावे, बाबू लाड, भरत घाडी, विजय घाडी, विलास रुमडे, शरद लाड तसेच तालुका असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले. क्रीडा महोत्सवाचा समारोप जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेने झाला. जिल्हास्तर खुला गट (पुरुष व महिला) कॅरम स्पर्धेचे (दिवस-रात्र) आयोजन करण्यास आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन अजित गोगटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग कॅरम असोसिएशनचे सचिन घाडी, अनिल कम्मार, रोहन राजाध्यक्ष आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन रेश्मा जोशी यांनी केले. क्रिडा अधिकारी विजय शिंदे तसेच सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अवधूत भणगे यांनी सदिच्छा भेट दिली. दोन्ही मान्यवरांचा मंडळाच्या वतीने शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देवून सन्मान केला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तालुका असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश प्रभू, खजिनदार सनित आचरेकर, सदस्य योगेश कोळी, संदिप राणे, चित्तरंजन बाणे, मेषक राणे, चंदन दळवी यांचे सहकार्य लाभले. स्पर्धा आयोजनासाठी जिल्हा असोसिएशनचे योगेश फणसळकर यांचे मार्गदर्शन मिळाले.

चौकट
अन्य विजेते
जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे, गौतम यादव (कणकवली), सागर ढवळ (कुडाळ), डॉ. अनिल तायशेटे व अर्पित बांदेकर पहिले चार आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com