
योगेश वायंगणकर यांचा सत्कार
82299
तळेरे ः ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धेसाठी निवड झालेल्या योगेश वायंगणकर यांचा सत्कार करताना तळेरे ग्रामस्थ, संस्था पदाधिकारी.
योगेश वायंगणकर यांचा सत्कार
तळेरे : सिंधुदुर्गनगरी येथे झालेल्या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत येथील योगेश वायंगणकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांची १६ फेब्रुवारीला पुणे येथे होणाऱ्या ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धेसाठी निवड झाली असून याबद्दल त्यांचे तळेरे ग्रामस्थ आणि विविध संघटनांतर्फे सत्कार करण्यात आला. येथील सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि तळेकर वाचनालयातर्फे आयोजित या कार्यक्रमात वायंगणकर यांना सूर्यकांत तळेकर, ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, सरपंच हनुमंत तळेकर यांच्या हस्ते सत्कार झाले. यावेळी निवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकारी सूर्यकांत तळेकर म्हणाले की, ‘‘योगेश हा तळेरे गावची शान असून त्याच्या यशाचा गावाला अभिमान आहे.’’ यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष चंद्रकांत तळेकर, वाचनालयाचे अध्यक्ष विनय पावसकर, शशांक तळेकर, शरद वायंगणकर, मनोज तळेकर, उदय पाटील, संतोष तळेकर, बापू वायंगणकर, अशोक तळेकर, हरिश्चंद्र शेलार, अमोल सोरप, निकेत पावसकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी हरिश्चंद्र शेलार, बापू वायंगणकर यांनी मनोगत व्यक्त केले.