Thur, June 1, 2023

तळेरेत रायफल शूटिंगचे प्रशिक्षण
तळेरेत रायफल शूटिंगचे प्रशिक्षण
Published on : 12 February 2023, 2:00 am
८२३०७
तळेरेत रायफल शूटिंगचे प्रशिक्षण
तळेरे ः येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात दळवी महाविद्यालयाचे माजी मानद मार्गनिर्देशक विनायक दळवी यांनी विद्यार्थ्यांना नेमबाजीचे प्रशिक्षण दिले. महाविद्यालयात नेमबाजीचे आंतरमहाविद्यालयीन, आंतरविद्यापीठीय स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे म्हणून त्यांनी पुढाकार घेतला होता. मुलांमध्ये नेमबाजीची आवड निर्माण करणे, त्यांना तंत्रशुद्ध शिक्षण देऊन, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी तयार करणे हा उद्देश यामागे होता. शारीरिक शिक्षक एन. बी. तडवी, प्राध्यापिका ए. बी. कानकेकर, प्रा. अविनाश मांजरेकर, एनसीसीचे कॅडेट्स, इतर विद्यार्थी व दळवी महाविद्यालयाचे नरेश पटकारे, निनाद दानी, नितीश गुरव, नरेश शेटये, चेतन नेमन व प्रशांत हाटकर आदी उपस्थित होते.