‘त्या’ अनधिकृत बांधकामाची 
जिल्हा काँग्रेसकडून पाहणी

‘त्या’ अनधिकृत बांधकामाची जिल्हा काँग्रेसकडून पाहणी

82421
रेडी ः यशवंतगडाच्या तटबंदीनजीक सुरू असलेले अनधिकृत बांधकाम.

‘त्या’ अनधिकृत बांधकामाची
जिल्हा काँग्रेसकडून पाहणी
वेंगुर्ले ः रेडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जलदुर्ग यशवंतगडाच्या तटबंदीला लागून होत असलेल्या अनधिकृत बांधकामाची पाहणी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी कार्यकर्त्यांसह केली. यातील दोषींवर संघटीत गुन्हेगारीच्या कलमानुसार मोक्का लावण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तटबंदीलगत मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले असून यामुळे तटबंदीला धोका निर्माण झाला आहे. येथे होत असलेल्या बांधकामाला परवानगी कोणी दिली, एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्खनन होईपर्यंत शासकीय यंत्रणा झोपली होती का, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जलदुर्गाला धोका पोहोचवणाऱ्यावर कोणती कारवाई होणार, असे प्रश्न उपस्थित करून हे कृत्य म्हणजे संघटीत गुन्हेगारीचा प्रकार आहे. त्यामुळे यात जे दोषी आढळतील, त्यांच्यावर संघटीत गुन्हेगारीच्या कलमानुसार मोक्का लावण्यात यावा, अशी मागणी यावेळी शेख यांनी केली. यावेळी वेंगुर्ले पंचायत समितीचे माजी सभापती जगन्नाथ डोंगरे, माजी उपसभापती सिद्धेश परब, शिरोडा उपसरपंच चंदन हाडकी, अभिजीत राणे, आनंद गोडकर इत्यादी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
................
82422
वेंगुर्ले ः येथील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणे मिटविण्यात आली.

वेंगुर्लेत ७८ प्रकरणांचा निपटारा
वेंगुर्ले ः येथील राष्ट्रीय लोकअदालतीत तालुक्यातील एकूण ७८ प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. तर कौटुंबिक हिंसाचार कायदाअंतर्गत दाखल एका प्रकरणात अर्जदार व जाबदार यांच्यामध्ये यशस्वीरित्या तडजोड होऊन ती एकत्र नांदण्यास गेली. तालुका विधी सेवा समिती व तालुका बार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने येथील दिवाणी न्यायालयात काल (ता. ११) राष्ट्रीय लोकआदालत झाली. त्याचे उद्घाटन तालुका विधी सेवा समिती अध्यक्षा तथा दिवाणी न्यायाधीश के. के. पाटील व पॅनेलप्रमुख तथा दिवाणी न्यायाधीश डी. वाय. रायरीकर यांच्या हस्ते झाले.
या अदालतीमध्ये दिवाणीकडील ८, फौजदारी ११ प्रकरणे व ग्रामपंचायत पाणीपट्टी, घरपट्टी व विविध बँका यांच्याकडील एकूण ४९ वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. यावेळी दिवाणी, फौजदारी व वादपूर्व प्रकरणातील २० लाख २१ हजार ७७८ एवढी रक्कम वसूल झाली. पॅनेल सदस्य म्हणून अॅड. पूनम नाईक यांनी काम पाहिले. यावेळी न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक एस. एस. कांबळे, एस. एच. खेडेकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com