पांग्रड येथे 17 ला महाआरोग्य शिबिर

पांग्रड येथे 17 ला महाआरोग्य शिबिर

पांग्रड येथे १७ ला महाआरोग्य शिबिर
विजय चव्हाण; कुडाळ पंचायत समितीचा संयुक्त उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १३ ः कुडाळ पंचायत समिती, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, पांग्रड-निरुखे ग्रामपंचायत, बॅ. नाथ पै शिक्षण संस्था कुडाळ, एन. व्ही. कुलकर्णी विद्यामंदिर पांग्रड-निरुखे व ग्रामस्थांच्या सहकार्याने आपला गाव, पंचक्रोशी, दशक्रोशी सुदृढतेसाठी जिल्ह्यात प्रथमच विविध दुर्धर व्याधींवरील तपासण्या, निदान व उपचारांसाठी १७ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजता एन. व्ही. कुलकर्णी विद्यामंदिर पांग्रड येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरात सर्व महत्त्वाची उपकरणे, साधने व सुविधांसह तज्ज्ञ डॉक्टरांच्या सर्व सेवा उपलब्ध असणार आहेत, अशी माहिती निमंत्रक व गटविकास अधिकारी विजय चव्हाण, प्रा. अरुण मर्गज यांनी दिली. जिल्ह्यात प्रथमच पांग्रड गाव ई-हेल्थ कार्ड करण्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला.
याबाबत चव्हाण म्हणाले, ‘‘शिबिरात पांग्रड गाव महाराष्ट्रातील पहिले ई हेल्थ उपकेंद्र करण्याचा मानस असून, सर्व प्रकारच्या रुग्णांची तपासणी, रोगनिदान व तातडीचे उपचार केले जातील. आवश्यक शस्त्रक्रिया करून अंतिम उपचारापर्यंत रुग्णांच्या सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या केल्या जातील. नेत्र चिकित्सा व उपचार, तसेच पुढे संदर्भित करून मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोफत करून दिल्या जातील. हृदयाची काळजी घेण्यासाठी ईसीजी सेवा उपलब्ध असेल. जन्मजात हाडांचे (अस्थी) विकार, तसेच अन्य अस्थी विकार तपासणी निदान व उपचार करून भविष्यात डेरवण येथील वालावलकर कॅंसर हॉस्पिटलच्या पथकाद्वारे सर्व प्रकारच्या कॅन्सर रुग्णांची तपासणी, निदान व उपचार तसेच भविष्यकालीन सेवांचा मानस आहे.’’
पांग्रड, निरुखे गावांसह दशक्रोशी, पंचक्रोशीतील सर्व गरजू नागरिकांनी या मोफत महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन निमंत्रक प्रशासक व पंचायत समिती गटविकास अधिकारी विजय चव्हाण, डॉ. संदेश कांबळे, संस्था चेअरमन आर. टी. मर्गज, पांग्रड सरपंच कावेरी चव्हाण, निरुखे सरपंच कीर्तीकुमार तेरसे, उमेश गाळवणकर, प्रा. अरुण मर्गज, उपसरपंच महानंदा मेस्त्री, रामकृष्ण तेरसे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com